Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण बाजारपेठ बंद

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे. तो आटोक्यात यावा त्यासाठी उरण व्यापारी असोशिएशनने शुक्रवारी (दि. 20) उरण बंदचे अवाहन केले होते. उरण  व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष व उरणचे आमदार महेश बालदी, उपाध्यक्ष कौशिक शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता व सदस्य यांनी उरण बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

मच्छी विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण पमपातर्फे व्यवस्थित करावे; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळीवाडा मच्छी मार्केट मधील मच्छी विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण व्यवस्थितरीत्या होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात आयुक्तांकडे निवेदन त्यांनी दिले आहे. भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरापालिका हद्दीतील फेरिवाल्यांचा सर्व्हे पनवेल महानगरपालिकेमार्फेत …

Read More »

भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांची विशेष जनजागृती

पनवेल : वार्ताहर कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात सर्व प्रशासन यंत्रणा मेहनत असून नागरिकही सहकार्य करीत आहेत. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महासचिव व नगरसेवक विक्रांत पाटील हे या विषयात विशेष जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विक्रांत पाटील यांनी यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची …

Read More »

गव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता आठवीत शिकणार्‍या नऊ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील प्राविण्याबद्दल सलग चार वर्षे प्रत्येकी 12 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. अर्थात प्रत्येक …

Read More »

अमेरिका टू निगराणी कक्ष व्हाया नेरळ

कर्जत : बातमीदार अमेरिकेत नोकरी करीत तरुण गुरुवारी (दि. 19) नेरळ येथे आपल्या घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. तो कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला रुग्ण नाही, परंतु खबरदारी म्हणून त्याला जीवन विद्या मिशन येथील निगराणी कक्षात पुढील 14 दिवस ठेवण्यासाठी नेण्यात आले आहे. …

Read More »

माणगाव रोटरी क्लबतर्फे मास्कवाटप

माणगाव : प्रतिनिधी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ माणगाव यांनी शुक्रवारी (दि. 20) मास्कचे वाटप केले. जनतेशी सतत संपर्क असणारी माणगावातील शासकीय-निमशासकीय कार्यालये, बसस्थानक, विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना रोटरी क्लबतर्फे शुक्रवारी मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. मोहन मेथा, सचिव बिपीन …

Read More »

कोरोनामुळे जिल्ह्याच्या जनजीवनावर परिणाम; म्हसळ्यातील बाजारपेठेत शुकशुकाट; नागरिक सतर्क

म्हसळा : प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील सात दिवस धोक्याचे असून, नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा पद्धतीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नगरपंचायत विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती केल्याने गुरुवारी  (दि. 19) म्हसळा बाजारपेठेत गर्दी कमी झाल्याचे चित्र होते, प्रवासी वाहतूकसुद्धा निम्म्यावर आली होती. गर्दी टाळणे हा कोरोना …

Read More »

नळजोडणीधारकांसाठी सुधारित दर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळजोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात येणार आहेत. सिडकोच्या हद्दीतील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे, द्रोणागिरी या नोडमधील …

Read More »

कळंबोलीत कोरोनाविरोधात नगरसेवकाचा लढा

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्यातर्फे जनजागृती पनवेल : वार्ताहर कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. या महामारी रोगाविरोधात अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि व्यक्ती उतरले आहेत. पनवेल मनपाचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती आणि प्रबोधन सुरू केले आहे. कळंबोलीत महत्त्वाच्या ठिकाणी …

Read More »

खारघरमध्ये मोफत मास्कवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूपासून होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सॅनिटायझर व मास्कची आवश्यकता आहे व बाजारात या मास्कचा तुटवडा असून जे आहेत ते चढ्या भावाने विकले जात आहेत. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने खारघर-तळोजा मंडल उद्योग आघाडीच्या वतीने खारघर रेल्वेस्टेशनच्या प्रवाशांना 300 मास्कचे मोफत …

Read More »