पनवेल : वार्ताहर तळोजा मध्यवर्ती कारागृहात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वरींदरकौर बलकारसिंग अठवाल या महिलेला अडविण्यात आल्यामुळे वरींदरकौर हिने तळोजा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या तीन महिला शिपायांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महिला पोलीस शिपायांनी दिलेल्या तक्रारीवरुन खारघर पोलिसांनी वरींदरकौर हिच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणुन मारहाण …
Read More »एसटी बसचालक व वाहकाचा प्रामाणिकपणा
हरवलेली दीड तोळ्याची सोनसाखळी मूळ मालकाला परत अलिबाग : प्रतिनिधी एसटी बसमध्ये प्रवाशाची हरवलेली दीड तोळ्यांची सोनसाखळी अलिबाग डेपोचे चालक रा. सू. कवळे आणि वाहक अ. को. टोपलवार यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला सुपूर्द केली. या प्रमाणिकपणाबद्दल चालक आणि वाहक यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. अजोगो अब्दुला पठाण असे प्रवाशांचे नाव …
Read More »नागरिकांनी सतर्क रहावे -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे, नागरिकांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गासंबंधात खूप काही कानावर येत आहे. वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळत आहेत. …
Read More »टेम्पोचालकाला रॉडने मारहाण
माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी महाड बाजुकडून पनवेलकडे निघालेल्या मॅक्झीमो टेम्पोची ठोकर लागून ईको कारचा गार्ड चेपला. त्यामुळे संतत्प झालेल्या ईको कारमधील इसमांनी टेम्पो चालक सूरज संजय चंदनशिवे, याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर त्याचा सहकारी मोहम्मद खान यांना जबरदस्तीने गाडीत बसवून, इंदापूर वाढवण येथे नेवून …
Read More »लाखोंचा कॉपर वायर स्क्रॅप चोरी; उरण-खोपटा येथील कॉन्टिनेंटल वेअर हाऊसमधील प्रकार
उरण : प्रतिनिधी चायना देशातील हॅण्डन शहर येथून 20 जानेवारी 2020 रोजी 15 मॅट्रिक टॅन वजन असलेला आणि 64 लाख 50 हजार 805 रुपये किमतींचा कॉपर वायर स्क्रॅप 20 फुटी कंटेनर क्रं. सीबीएचयू-4188515 यामध्ये जेएनपीटी बंदरात पीएचके ग्लोबल इंटरप्राइजेस या पत्त्यावर पाठविण्यात आला होता. मूल्यांकन अधिकारी यांनी कंटेनरचे बॉटल सील …
Read More »थळ गुरचरण जागेतील कोळी बांधवांची खळी जमीनदोस्त
अलिबाग : प्रतिनिधी थळ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या गुरुचरण जागेत कोळी बांधवांनी मच्छी सुकविण्यासाठी तयार केलेली खळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रामपंचायतीने गुरुवारी (दि 19) जमीनदोस्त केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थळ ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी सर्व्हे नंबर 345/1 ही साडे पाच हेक्टर जामीन आहे. ही जमीन गुरुचरण म्हणून …
Read More »जलप्रवास रामभरोसे
मुंबईहून अलिबागला रस्त्याने येण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. त्यामुळे अलिबागहून मुंबईला जाणारे तसेच मुंबईहून अलिबागला येणारे प्रवासी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते मांडवा अलिबाग हा समुद्रमार्ग जलवाहतुकीचा प्रवास पसंत करतात. यात वेळ वाचतो. परंतु हा प्रवास कसा रामभरोसे असतो हे 14 मार्चच्या घटनेने दाखवून दिले आहे. अजंठा कंपनीची बोट …
Read More »कोरोना : सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडून पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सर्व शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, …
Read More »माणगावमध्ये गस्त घालणार्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला; चौघांचे कृत्य; आरोपींमध्ये महिलेचा समावेश
माणगाव : प्रतिनिधी गस्तीवर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी चालक यांच्यावर तीन अनोळखी पुरुष व एक महिला अशा चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना माणगाव तालुक्यातील वाढवण येथे बुधवारी (दि. 18) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात दोघे पोलीस जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर चारही आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध …
Read More »रायगडातील किल्ले, समुद्रकिनार्यांवर जाण्यास पर्यटकांना 31 मार्चपर्यंत बंदी
अलिबाग : जिमाका शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू केला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील किल्ले आणि समुद्रकिनारी होणारी गर्दी लक्षात घेता तेथे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय 31 मार्चपर्यंत अनिवार्य असणार आहे. किल्ले तसेच समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper