Breaking News

महत्वाच्या बातम्या

आजपासून वरसोलीची जत्रा

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा उत्पत्ती एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून 22 ते 26 नोव्हेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. संबंधित देवस्थान विश्वस्त समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, देवस्थानचे सेवेकरी, विविध व्यवस्थेसाठी व तयारीसाठी जोरदारपणे कामाला लागले आहेत.  या जत्रेसाठी केवळ परिसरातीलच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक मोठया …

Read More »

खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते -आरेकर

मुरूड : प्रतिनिधी  शरीर ही आपली महत्त्वाची संपत्ती असून, खेळ हे शरीर सुदृढ करण्याचे साधन आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुरूड नगर परिषदेचे पर्यटन सभापती पी. के. आरेकर यांनी येथे केले. सर एस. ए. हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा …

Read More »

विस्तार शिक्षण संचालकांची कृषी विज्ञान केंद्राला भेट

रोहे : प्रतिनिधी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी नुकताच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची पहाणी केली.  कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले व प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या व कृषि …

Read More »

नियोजन विभागाचे काम आता पेपरलेस

अलिबाग : प्रतिनिधी नियोजन विभागाचा संपुर्ण कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत केले जाणार आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. परिणामी …

Read More »

नागोठण्यातील बिल्डरविरोधात ’महारेरा’कडे तक्रार, आज मुंबईत सुनावणी

नागोठणे : प्रतिनिधी बांधकाम चालू करण्यापूर्वी ’महारेरा’कडे नोंदणी केली नसल्याचा ठपका ठेवत येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली असून, उद्या शुक्रवारी (दि. 22) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे. एखाद्या बिल्डरचे विरोधात नागोठण्यातून महारेराकडे पहिल्यांदाच अशी तक्रार झाली असल्याने निर्णय कसा असेल, याकडे येथील जनतेचे लक्ष केंद्रित …

Read More »

मुरुड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधी सदस्यपदाच्या पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी फक्त नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.  मुरुड तालुक्यातील राजपुरी (3 सदस्य), एकदरा (8 सदस्य), सावली, वावडुंगी, चोरडे, आणि नांदगाव (प्रत्येकी एक सदस्य) या सहा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यापैकी नादगांव ग्रामपंचायतीच्या …

Read More »

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 64 अर्ज दाखल

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील तिवरे आणि वरई या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. या दोन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच पदासाठी 7 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर ज्या दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होणार आहे तेथे प्रत्येकी एक उमेदवार असल्याने त्या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध होणार आहे. …

Read More »

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिवांची भेट

मुंबई ः प्रतिनिधी न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 21) राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत या वेळी उपस्थित होते. न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी, टीम मॅकलँडो, मेलीसा ली, न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या …

Read More »

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदांसाठी तसेच इतर भरती कार्यालयांमार्फत 41 डाक सेवक/सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी …

Read More »

राज्यपालांकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील शहीद 105 हुतात्म्यांना गुरुवारी (दि. 21) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी …

Read More »