खालापूर : प्रतिनिधी खोपोली शिळफाटा येथून कामावरून घरी चाललेल्या एका महिलेवर बुधवारी (दि. 13) सायंकाळी तीन ते चार बिहारी तरूणांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. सदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने शिळफाटा परिसरात …
Read More »बिबट्याचे पुन्हा दर्शन, खालापुरातील नागरिकांत भीतीचे वातावरण
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील नावंढे गावातून केळवली रेल्वे स्थानकाकङे जाणार्या रस्त्यावर सोमवारी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र या बिबट्याने पावसाळी वाढलेल्या गवतातून धूम ठोकली होती. गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केळवली गावाच्या शिवारात रेल्वेमार्ग ओलांडून बिबट्याने जांभरूंग गावाकडे धूम ठोकल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याने केळवली, खरवई, जांभरूंग गावात पुन्हा …
Read More »चिवे आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्या 65व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडीमुळे चिवे आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाशीम येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी …
Read More »ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलमधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स संघाने एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला नव्या मोसमासाठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. बोल्टने 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. …
Read More »पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी
हाँगकाँग : वृत्तसंस्था हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पी. व्ही. सिंधूने दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने 19व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी सायना …
Read More »बांगलादेशी फलंदाजांचे लोटांगण
पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात; भारत 1 बाद 86 इंदूर : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ 150 धावांत आटोपला. दरम्यान, …
Read More »स्थानिकांचं मरण
जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी न घेता आणि सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर अनधिकृतपणे बंगले बांधले आहेत. त्यावर कारवाई करण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे अलिबाग समुद्रकिनार्यावर एकही बेकायदा बंगला नको असे राज्य सरकारला बजावले आहे. हे चांगलेच झाले, परंतु …
Read More »निष्कलंकतेचा निर्वाळा
राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी अजब मागणी देखील काँग्रेसने लावून धरली. वस्तुत: अशा चौकशीमुळे राफेल विमानाचे तंत्रज्ञान, त्यातील गोपनीय शस्त्रास्त्र सुविधा हे शत्रूच्या हातात विनासायास पडले असते. म्हणून अशाप्रकारची चौकशीची मागणी अनाठायी आहे हे कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसासही कळेल. परंतु बालबुद्धीचे नेते आणि त्यांचे पाठिराखे यांना …
Read More »महाडमध्ये कार अपघात; एक ठार, दोघे जण जखमी
महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर नाते खिंड येथे झालेल्या कार अपघातात एक जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. एका पाण्याच्या डबक्यात कार उलटून मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला. महाडमधील व्यावसायिक नितीन मणिलाल मेहता, बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस मंगळवारी …
Read More »शिवसेनेचा दावा मान्य नाही!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper