पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व …
Read More »पनवेल पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 12) झाली. या वेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. उपस्थित सभासदांनी एकमताने साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची सन 2019-2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली. या वेळी नवीन कार्यकारिणी …
Read More »‘ती’ गावे तळोजा पोलीस ठाण्याला जोडावीत
पनवेल : बातमीदार तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदिवासी वाडी ही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, मात्र या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने …
Read More »तुपगाव : येथील संत गोरोबाकाका मंदिरामध्ये काकडा समाप्ती व दीप प्रज्वलन समारंभ उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष बापू घारे, मधुमती गुरव, हभप वसंत महाराज कुंभार, रामदास साळवी, सदाशिव साळवी, कमल हातनोलकर, रविशेठ आपटेकर, नंदकिशोर सोनावणे, अमोल अरुण गुरव, विजय ठोसर, नामदेव …
Read More »पनवेल : आमदार महेश बालदी यांनी चौक पं. स. विभागातील वावर्ले, बोरगाव, आंबेवाडी, बुरुजवाडी, तीनघर, भिलवले, वडविहीर येथील आदिवासी भागामध्ये जाऊन तेथील आदिवासी समाजाच्या समस्या जाऊन घेतल्या. या वेळी तालुकाध्यक्ष बापू घारे, विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, अरुण पार्टे, माजी सभापती दामू खैरे, नंदू सोनवणे, प्रकाश घोगरे, दर्शन पाळेकर, प्रवीण खंडागळे …
Read More »पनवेल : योगेश्वर कृपा हौ. सो. चिंतामणी हॉलसमोर रावजी चहाच्या अॅड. शुभांगी झेमसे आणि मनोज पाटील यांच्या शॉपचे उद्घाटन पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. पवार, अॅड. प्रल्हाद खोपकर, अॅड. डी. बी. पाटील, …
Read More »गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त शीख समाजाचे धर्मगुरू गुरुनानक यांची 550वी जयंती मंगळवारी (दि. 12) पनवेल परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील गुरुद्वारांना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले. श्री गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त …
Read More »राष्ट्रीय स्पर्धेत ‘नृत्यआराधना’च्या विद्यार्थ्यांचे सुवर्णयश
पनवेल : रामप्रहर वृत्त बंगळुरू येथे झालेल्या कल्पतरू नॅशनल डान्स कॉम्पिटीशन 2019 या राष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावरील …
Read More »खोपोलीत भटक्याची दहशत
सिद्धार्थनगरात चार लहान मुले जखमी खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असून, सिद्धार्थनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक लहान मुलांना चावा घेत जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर घटनेकडे नगर परिषद लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. खोपोलीतील सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा …
Read More »अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
सत्तास्थापनेचा पेच न सुटल्याने घटनात्मक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. 12) पाठविलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली. सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली, मात्र शिवसेना दावा सिद्ध करू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper