Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये नेत्रविकार तज्ज्ञ बनण्याची संधी

पनवेल : बातमीदार आपल्या देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पीडित आहेत. बर्‍याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो. खरे तर त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित त्यांचे डोळे …

Read More »

फुंडे कॉलेजमध्ये मुलींसाठी रक्त तपासणी शिबिर

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभाग व पी. एस. पेथॉलॉजीकल लॅब मोहोपाडा यांच्या वतीने बुधवारी (दि. 21) महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुधीर घरत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वीर वाजेकर कॉलेज फुंडे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण …

Read More »

पनवेलमध्ये ‘गोविंदा’च्या तयारीची धूम

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वत्र येत्या शनिवारी (दि. 24) दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी एकीकडे गोविंदा पथके थर लावण्याच्या तयारीला लागले आहेत; तर दुसरीकडे ज्या हंड्या फोडण्यासाठी थर लावले जातात. त्या हंड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी विविध प्रकारच्या आकर्षक हंड्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. …

Read More »

साई, बारापाडा पूरग्रस्तांना मदत

भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या साई येथील 45 कुटुंबांना, तर बारापाडा मोहल्ल्यात 47 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात …

Read More »

निसर्ग, पर्यावरण आणि आपण

निसर्ग म्हणजेच प्रकृतीची सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. भगवान बुद्धांचं एक वचन आठवतं. धम्मपदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानव मध्य देशामध्ये आहे. त्याचा अर्थ मानव ह्या सर्व अस्तित्वाच्या मध्यामध्ये …

Read More »

तारतम्याचे शिवधनुष्य

अनेकदा समाजमाध्यमांवर राष्ट्रविरोधी मजकूर आढळून येतो, काही वेळा विद्वेषाची बीजे पेरण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो. अशावेळी मूळ मजकुराचा स्रोत शोधणे सरकारी यंत्रणांकरिता आवश्यक असते. परंतु नेमक्या कुठल्या परिस्थितीत समाजमाध्यम कंपन्यांनी ग्राहकांची माहिती उघड करावी हा फारच कळीचा मुद्दा आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांची ताकद एव्हाना सर्वच क्षेत्रातील …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश

मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »

पवार परिवाराचे सांत्वन

फौजी आंबवडे (ता. महड) : भारतीय मजदूर संघाचे बांधकाम विभाग प्रदेश अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी स्मिता यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्हा सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने यांनी पवार परिवाराचे सांत्वन …

Read More »

सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार; चार जखमी

जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून …

Read More »

कविता आणि कथालेखन स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई  : रामप्रहर वृत्त नवी मुंबई साहित्य परिषदेचे पाचवे साहित्य संमेलन दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. यानिमित्ताने नवोदित  साहित्यिकांना संधी मिळावी या हेतूने कविता आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कविता स्पर्धेकरिता स्त्री भावनांचे दर्शन घडविणार्‍या कविता असाव्यात. कविता 16 ते 20 ओळींच्या असाव्यात. आलेल्या कवितांचा …

Read More »