दापोली ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या आनंता पांडुरंग भोईर विद्यालयामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …
Read More »पनवेल ः शहरातील तलावासमोरील भाजी मार्केट येथील म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बिकानेर हे दुकान नव्याने सुरू झाले आहे. याचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी शांताराम पाटील, हुसेन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर सरचिटणीस सपना पाटील यांना वाढदिवसानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Read More »पनवेल : शहरातील उरण नाका येथील मच्छीमार्केटच्या स्वच्छतेसंदर्भात सोमवारी महापालिकेच्या वतीने पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रसाळ, सहाय्यक आयुक्त भोसले, शहर अभियंता कटेकर आदी उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »बापाने केले मुलाचे अपहरण; उरण पोलीस आरोपीच्या शोधात
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे गावात आईच्या मृत्यूनंतर आजोबांकडे राहणार्या पाच वर्षांच्या तनुश विशाल तर्लोस्कर याचे त्याच्या वडिलांनी व आत्याने आपहरण केले असून, याबाबत त्यांच्या विरोधात तनुशचे आजोबा शांताराम गावंड (78) यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार आवरे येथील शांताराम गावंड व इंदिरा …
Read More »सामाजिक जाणिवेतून आरोग्य महाशिबिर -वाय. टी. देशमुख
पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक जाणिवेतून दरवर्षी आरोग्य महाशिबिर आयोजित केले जात असून, या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी केले आहे. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष …
Read More »उरण पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अडथळा निर्माण करणारी 18 अनधिकृत वाढीव गाळ्यांची अतिक्रमणे उरण नगर परिषदेने बुलडोझर लावून हटवली. यामध्ये काही गॅरेज, भाजीची दुकाने, टपर्यांंचा समावेश आहे. उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली होती. अनधिकृतपणे उभारण्यात …
Read More »बेलोशी येथे वृक्षारोपण
रेवदंडा : प्रतिनिधी – कुलस्वामिनी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने रविवारी (दि. 28) बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, बेलोशी ते वावे रस्ता आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राकेश भोपी यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपणाचा हेतू विषद केला. सरपंच कृष्णा भोपी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर …
Read More »दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी अनिल नवगणे यांची नियुक्ती
म्हसळा : प्रतिनिधी – शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनिल नवगणे यांची दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. म्हसळा तालुक्यातून माजी सभापती …
Read More »नेहरू युवा केंद्रातर्फे भादाव गावात स्वच्छता अभियान
पाली : प्रतिनिधी – नेहरू युवा केंद्र अलिबाग यांच्या वतीने आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नितीश दिलीप भादावकर यांच्या पुढाकाराने भादाव गावात सलग दोन दिवस स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. भादाव युवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि आदिवासी ग्रामस्थ यांच्या मदतीने हे स्वच्छता अभियान यशस्वी झाले. पहिल्या दिवशी भादाव आदिवासीवाडी व परिसर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper