वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे आणि पनवेलचा चेहरामोहरा विकासात बदलणारे सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) अनेक मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद …
Read More »सक्षम ऐतिहासिक निर्णय
मोदी सरकारने मोठ्या धडाडीने व संपूर्ण तयारीनिशी हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याने काश्मीरच्या नावावर हुतात्मा झालेल्या हजारो सैनिकांना आज देशाकडून खर्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकेकाळी नंदनवन असे संबोधल्या जाणार्या काश्मीरमध्ये गेली अनेक दशके धगधगणार्या असंतोषाला व अशांततेला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले …
Read More »नागोठणे पूर्वपदावर; लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
नागोठणे : प्रतिनिधी शहरात रविवारी आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घराची तसेच दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. लोकांनी दुसर्या दिवशीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविली होती. भिजलेला माल तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सोमवारी (दि. 5) कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ तसेच कोळीवाडा भाग स्वच्छ करण्यात …
Read More »उमरोलीत शाळेचे छप्पर उडाले
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पाच महिन्यांपूर्वी घालण्यात आलेले छप्पर वादळी वार्याने उडून गेले आहे. दुसरीकडे, डिकसळपासून पुढे कर्जत भागातील वीज खंडित झाली. सरपंच सुनीता बुंधाटे यांनी दिवसभर उभे राहून शाळेची पत्रे पुन्हा इमारती वर छप्पर टाकण्यासाठी उभे राहून काम करीत होत्या; तर …
Read More »रोहा-मुरूड मार्गावर संरक्षक कठडा कोसळला; रस्ता बंद
रोहे : प्रतिनिधी रोहा-मुरूड मार्गावर कवळटे अदिवासीवाडीजवळ रविवारी रात्री रस्त्याच्या संरक्षक कठड्याची एक बाजू पूर्णपणे कोसळल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, तर याच मार्गावर नाल्यालगत असलेला रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे. चार दिवस रोह्यात अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीला पूर आला होता. नदीकाठावरील गावांचे नुकसान झालेे. पावसाचा कहर मोठा असल्याचा …
Read More »नेरळ-शेलू रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
कर्जत ः बातमीदार मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जतदरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक लवकरच सुरू होईल. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे. शनिवारी …
Read More »पोलादपूरमध्ये रस्ता गेला वाहून
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोतवाल खुर्द रेववाडी रस्त्यावर शनिवारी झालेल्या धरणी दुभंगाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी संपूर्ण रस्ताच दरीकडे झेपावत नदीच्या पाण्यापर्यंत वाहून गेला. त्यामुळे कोतवाल खुर्द रेववाडी, सकपाळवाडी आणि धनगरवाडीतील जनतेचा संपर्क तुटला आहे. या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाहणी करण्यात येऊन सतर्कतेचा उपाय …
Read More »बीसीटी विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत सुयश
उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. बीसीटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आणि 14 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव तालुक्यात झळकावले. याबद्धल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन …
Read More »आरोग्य शिबिरात ‘सीकेटी’चा सहभाग
पनवेल : वार्ताहर सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 300 स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन …
Read More »सरपंच अमित पाटील यांच्याकडून दिघाटीतील पूरग्रस्तांना नाश्तावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरून हवालदिल झालेल्या दिघाटी ग्रामस्थांसाठी सरपंच अमित पाटील यांनी नाश्त्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे रविवारी सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातही पाताळगंगा नदीचे पाणी शिरले होते. हे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने त्यांची परवड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper