Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील चिखले आणि शिवकर येथील शाळांमध्येे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 17) करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच …

Read More »

तपपूर्तीकडे वाटचाल

एकीकडे वृत्तपत्र आणि टीव्ही या दोन माध्यमांमधील स्पर्धा वाढत असतानाच माहितीयुग अवतरले आणि इंटरनेटचे जाळे झपाट्याने अवघे जगणे व्यापू लागले. आता वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांचीही वृत्तविषयक वेबसाईट ही नवी शाखा सामोरी येऊ लागली. एकीकडे झपाट्याने होत चाललेल्या माध्यमांच्या आधुनिकीकरणाच्या या काळात विधायकतेच्या जागराची गरज म्हणून ‘रामप्रहर’ या दैनिकाचा जन्म झाला. …

Read More »

सारिका आंब्रेचा मृतदेह नऊ दिवसांनी सापडला

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उमरोली पुलावरून पत्नीसोबत दुचाकीवरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाढी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या सारिका आंब्रे यांचा मृतदेह गुरुवारी (दि. 17) तब्बल नऊ दिवसांनी बेलापूर खाडीत सापडला. आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य 9 जुलैला दुचाकीसह वाहून गेले होते. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ …

Read More »

मनसैनिक महेश निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाड : येथील वीरेश्वर मंदिरात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक महेश निकम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. (छाया : शैलेश पालकर)

Read More »

आरोग्य महाशिबिर यशस्वी करा ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर यंदा 4 ऑगस्टला होणार असून, दरवर्षीप्रमाणे हे महाशिबिर यशस्वी करावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नियोजन बैठकीत केले. सिडको अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

सुशीला घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नवीन पनवेलमधील सीकेटी स्कूलमध्ये अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, दाखले वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात …

Read More »

भाजप नेते महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप

उरण ः वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक  कौशिक शहा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगर परिषद शाळा क्र. 1 व 2 येथे होणार आहे. या …

Read More »

निवृत्त न्या. ग. मो. खांबेटे यांचे निधन

मुंबई : लघुवाद न्यायालयाचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य न्यायाधीश गणेश मोरेश्वर खांबेटे ऊर्फ आबासाहेब खांबेटे यांचे सोमवारी (दि. 15) वृद्धत्वाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. एक कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या मागे पत्नी, पत्रकार सुपुत्र सतीश खांबेटे, दोन कन्या, नातवंडे आणि अन्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने …

Read More »

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नितीनचा मृत्यू

पालकांचा आरोप; चौकशी करून कारवाईची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या नितीन हरिभाऊ घरत (35) या तरुणाचा केअरपॉइंट दवाखान्यातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत मुलाचे पालक हरिभाऊ घरत यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणीही पालकांनी केली असल्याचे समजते. नितीन …

Read More »

कॅन्सर जागरूकता शिबिर

पनवेल मनपाचा मार्गदर्शनपर उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गर्भाशय, मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हे शिबिर आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. …

Read More »