Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईकर ओलांडणार उच्च मतदानाचा टप्पा?

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 29) पार पडत आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. यात ठाणे, मीरा-भाईंदरसोबत नवी मुंबईतदेखील मतदान होणार आहे. कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत घटलेल्या मतदानाच्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जागरूक मतदार मतदानाचा टक्का …

Read More »

दुर्गम केंद्रांवरही पोहचले मतदान कर्मचारी

कर्जत ः बातमीदार मावळ मतदारसंघात होणार्‍या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरही परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणार्‍या या पथकाशी सातत्याने …

Read More »

कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढत -विजय नाहटा

नवी मुंबई : बातमीदार ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते  वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात …

Read More »

उरण मतदारसंघात जोरदार तयारी

उरण ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघात 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, उरण नगर परिषदेसह उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ, पनवेल तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ व खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदारसंघातील एक लाख 46 हजार 25 पुरुष आणि एक लाख 44 हजार 248 महिला असे …

Read More »

पनवेल-उरणमध्ये मतदानाची तयारी

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. त्याची जोरदार तयारी प्रशासनातर्फे सुरू असून, रविवारी पनवेल तहसील कार्यालयातर्फे मतदानासाठी संबंधित कर्मचार्‍यांना मतदान यंत्रसामुग्रीचे वाटप करण्यात आले. त्याची चित्रमय झलक. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

‘एक ही भूल’

‘एक ही भूल’ हा  ए. पूर्णचंद्र राव यांच्या लक्ष्मी प्रोडक्शन्सचा 1981मध्ये जितेंद्र आणि रेखा यांची भूमिका असलेला चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्यामध्ये राम (जितेंद्र) आणि साधना (रेखा) एक श्रीमंत विवाहित जोडपे आहेत. राम एक पदवीधर असून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी  असतो. त्याच्या हातून नशेत एक चूक घडते. त्यामुळे साधना त्याला …

Read More »

कर्जत शहरात पोलिसांचा रूट मार्च

कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शनिवारी (27 एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी कर्जत शहरातील सर्व भागात रूट मार्च केले. 18 …

Read More »

वाढलेल्या तापमानामुळे आंबा उत्पादनात घट

अलिबाग : प्रतिनिधी मार्च महिन्यापर्यंत लांबलेली थंडी, मागील 15 दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची भीती रायगडातील आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम …

Read More »

श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा स्वच्छ

रेवदंडा : प्रतिनिधी श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयोजनातून हजारो श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा नित्य स्वच्छ असल्याचे रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनीषा चुनेकर यांनी म्हटले. रेवदंडा समुद्रकिनारी आठ, पंधरा व महिन्यामध्ये समुद्र किनारा, तसेच सुरूबन स्वच्छता मोहीम असंख्य श्रीसदस्यांच्या श्रमदानातून राबविली जाते. समुद्रकिनार्‍यावरील केरकचरा, अनावश्यक वाढलेली झाडेझुडपी अथवा प्लॅस्टिक बाटली …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील चार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कक्षेत कर्जत, नेरळ आणि माथेरान या तीन …

Read More »