Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक

वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर; सर्वपक्षीय संघर्ष समिती संतप्त मुरूड : प्रतिनिधी  मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक सुरू असून, हे वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने संताप व्यक्त केला आहे. मुरूड येथील वीज मंडळाने काही दिवसापूर्वीच सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून दत्तमंदिर परिसरात वीज उपकेंद्राचे उद्घाटन …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट

नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्‍या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी …

Read More »

रेल्वे रुळावर पबजी खेळणे महागात; दोघे ठार

हिंगोली : प्रतिनिधी : पबजी गेमच्या वेडापायी हिंगोलीत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नागेश गोरे (वय 22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग असताना दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यातच त्यांचा …

Read More »

न्यूझीलंडमधील गोळीबारात सात भारतीयांचा मृत्यू

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था : न्यूझीलंडमध्ये मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सात भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये हैदराबादमधील एक, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे आहेत. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंणातील असल्याचे समजते. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये शुक्रवारी …

Read More »

‘चौकीदार नरेंद्र मोदी’

पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरील नाव बदलले नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘चौकीदार’ हा शब्द अधोरेखित केला आहे. देशभरातील सभांमध्ये स्वतःचा ‘देश का चौकीदार’ असा उल्लेख करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरील …

Read More »

रात्रीस खेळ… चाले हा…

नितीन देशमुख : पनवेल –  दो भेल देना’, ‘एक भेल… कांदा टमाटर जादा’ …एकामागोमाग एक ऑर्डर्स सुरू असतात. भेळवालाही सगळे जिन्नस एकत्र करून झटपट भेळेची पुडी तयार करून देत असतो. मुंबईतल्या जवळपास सगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये संध्याकाळच्या वेळी हे चित्र दिसून येऊ लागलंय. भेळेला अचानक एवढी मागणी येण्याचं कारण डाएटच्या बाबतीत मुबईकरांमध्ये …

Read More »

पनवेल, उरण, कर्जतच्या मतदारांवर मावळची मदार

उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे तीन विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी 2008मध्ये राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड …

Read More »

‘मैं भी चौकीदार’; भाजपचा नवा प्रचार फंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, ‘चौकीदार चौर हैं’ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुरुवात करून दिली. ‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय, पण मी एकटा …

Read More »

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई : ना. सुभाष देसाई

महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात युतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. 16) महाड येथे झाली. या बैठकीत पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, ही लढाई म्हणजे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेल्या तटकरेंच्या धनशक्तीविरोधात निष्कलंक गीतेंच्या जनशक्तीची आहे, …

Read More »

‘अफाट’ लोकप्रिय असलेल्या कांती कडूंना आता पनवेल विधानसभेची उमेदवारी द्या!

जनतेची एकमुखी मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खरे पाहता आयुष्यभर खस्ता खात केलेल्या (तथाकथित) समाजकार्यामुळे प्रसिद्ध ठरलेल्या कांती कडू हे 2006 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला, तसेच 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहू न शकल्यामुळे पनवेलकर या अफाट लोकप्रियता लाभलेल्या लोकप्रतिनिधीला मुकले. केवळ त्यामुळेच प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष …

Read More »