Breaking News

महत्वाच्या बातम्या

क्रीडा पत्रकार, संघटक, प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी लाल मातीतील खेळाडू म्हणून दम घुमवल्यानंतर कबड्डी, खो-खो आणि कुस्तीसारख्या देशी खेळांना वर्तमानपत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे हाडाचे क्रीडा पत्रकार, अ‍ॅथलिट, क्रीडा संघटक, खो-खो, कबड्डी प्रशिक्षक शिवराम सोनवडेकर यांचे बुधवारी (दि. 20) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत कोप्रोली किंग विजेता

उरण : वार्ताहर आम्ही पिरकोनकर समूहातर्फे खास चिमुकल्यांसाठी उरण पूर्व विभागात प्रथमच 15 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी मर्यादित षटकांची स्पर्धा रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन पिरकोनचे माजी सरपंच गन्नाथ ठाकूर यांच्या हस्ते झाले. पुलवामा येथील …

Read More »

‘शहीद जवानांसाठी क्रिकेट मालिका जिंकायचीय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आर्थिक मदत केली. याबरोबरच शहीद जवानांसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची क्रिकेट मालिका जिंकायची आहे, असे शमीने म्हटले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शमीने तीव्र शब्दांत निषेध केला. तो म्हणाला, मी क्रिकेट खेळतो, पण माझा देश सीमेवरील जवानांमुळे सुरक्षित …

Read More »

नवी मुंबईतील शिवानीची सॉफ्टबॉल संघात निवड

नवी मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मनकापूरमधील जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित महिलांच्या 19 वयोगटातील सॉफ्टबॉल स्पर्धेत वाशी येथील शिवानी गायकवाड हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. शिवानी ही ओरियंटल सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची …

Read More »

संदीप गुरव यांचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी रायगड येथील दिव्यांग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांना व्हीलचेअर तलवारबाजी खेळात जागतिक स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) प्रदान करण्यात आला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या शानदार सोहळ्यात गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले गेले. …

Read More »

धोक्याची घंटा

वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष आता मुंबई-ठाण्यासारख्या शहरी भागांत किती उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे हे यातून स्पष्ट होते. 1999 ते 2005 या कालावधीत महाराष्ट्रात बिबळ्यांच्या हल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला होता तर 902 जण जखमी झाले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात या समस्येने अतिशय उग्र रूप धारण केले होते. …

Read More »

एमजीपीएलचा केएम ग्रुप विजेता

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग (एमजीपीएल)चे आयोजन करण्यात आले होते. यात केएम ग्रुप संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मानिवली परिसरातील भव्य पटांगणात रंगलेल्या एमजीपीएलमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. या वेळी चुरशीचे सामने होऊन वरई लिओन्स इलेव्हन संघ उपविजेता ठरला. या वेळी माजी …

Read More »

भारत, इंग्लंड विश्वचषकाचे दावेदार : गिब्स

केपटाऊन : वृत्तसंस्था आयसीसी विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार कोण असेल, याबाबत क्रिकेटमधील जाणकारांपासून  क्रिकेटप्रेमींपर्यंत प्रत्येक जण आपले मत व्यक्त करीत आहे. अनेकांनी भारताला या स्पर्धेसाठी प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्सचीही भर पडली आहे. त्याने भारतासह …

Read More »

राज्यस्तरीय कबड्डीचा दम

मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …

Read More »

महायोजना शिबिर नागरिकांसाठी लाभदायक -मुख्यमंत्री

पुणे ः प्रतिनिधी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबिर 2019चे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय …

Read More »