Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जत येथील विनय वेखंडे यांची शेती अभ्यास दौर्यासाठी निवड

कर्जत : प्रतिनिधी इस्रायल देशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्‍यांचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. शेतकरी दौर्‍यासाठी कर्जत तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय मारुती वेखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी आयुक्तालयातर्फे  देशाबाहेरील प्रगत आणि उत्पादकता वाढ करण्यात …

Read More »

संत रोहिदास महाराज जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास ज्ञाती विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ सावळे आणि जय दुर्गामाता सांस्कृतिक व सेवाभावी मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव सावळे येथे मोठ्या उत्साहात झाला. ह.भ.प. गुरुवर्य किसन महाराज साखरे, ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर, तसेच ह.भ.प. तुकाराम …

Read More »

कर्जतच्या बळीवरे नदीपात्रात रेती उत्खनन

कर्जत : बातमीदार तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बळीवरे नदीवरील पुलाखाली रेती उत्खनन सुरू असून, या रेती उत्खननामुळे येथील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खनन करून पुलाखाली मोठमोठे खड्डे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

रोह्यात भाजप शिवसेना युतीचा जल्लोष

रोहे ः प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेना युती होताच रोह्यातील राम मारूती चौकात दोन्ही पक्षाकडून जल्लेाष करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करीत युतीच्या घोषणा देण्यात आला. या वेळी भाजप नेते व समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित …

Read More »

कॅन्सरविरोधात जोरदार लढा

पनवेलमध्ये रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी पनवेल : वार्ताहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 19) पनवेल परिसरातील रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 100पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी घेतला असून, त्यात दोघांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम …

Read More »

भाजपप्रणित जनशक्ती आघाडीला निवडून द्या -ना. रवींद्र चव्हाण

पाली : प्रतिनिधी राज्य व देशाच्या प्रगतशिल वाटचालीत सत्ताधारी भाजप युती सरकारचे योगदान महत्वपुर्ण ठरत आहे. मागील अनेक वर्ष विकासापासून वंचीत असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगिण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबध्द आहे. शिहू ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावांना मुलभूत सेवासुविधा पुरविण्याबरोबरच सर्वांगिण विकास साधण्यासाठी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित …

Read More »

रोठा सुपारीने श्रीवर्धनची ओळख

सुपारी हे कोकणातील एक नगदी बागायती पीक असून त्याच्या लागवडीखाली महाराष्ट्रात सुमारे 2400 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या ठिकाणी संशोधन करून त्याची जात ठरविली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी …

Read More »

ओरिएन्टल महाविद्यालयात पदवीदान समारंभ साजरा

सानपाडा : प्रतिनिधी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ लॉ, ओरिएन्टल कॉलेज ऑफ एज्युकेशन, ओरिएन्टल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 16) रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन भवन येथे पदवीदान समारंभ झाला. या वेळी 445 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने …

Read More »

आग्र्यात काश्मिरींना हॉटेलबंदी

आग्रा ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रूमही न देण्याचा निर्णय काही हॉटेलचालकांनी घेतला आहे. यासंदर्भातील काही पत्रकेही या हॉटेल व्यावसायिकांकडून छापण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका हॉटेलचा व्यवस्थापक फिरदौस अलीने हॉटेलांच्या या निर्णयाचे समर्थन …

Read More »

शहीदांच्या कुटुंबांना देणार घरे; ‘क्रेडाई’ची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ‘क्रेडाई’ (द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली. संघटनेच्या अधिकार्‍यांनी याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष असणार्‍या जेक्सी शाह यांनी याबद्दल अधिक माहिती …

Read More »