भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली आहे. गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि. 13) कालभैरव मंदिरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मागील पाच …
Read More »पनवेल ग्रामीण भागात लागणार पाण्याचे मीटर
खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावांमध्ये लवकरच पाण्याचे मीटर लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा काढण्यात येणार असून याकरिता सुमारे 18 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत या कामाला मंजुरीदेखील मिळाली आहे. पनवेल शहर व ग्रामीण भागात हे मीटर लागणार …
Read More »नवी मुंबईतील नागरी समस्या सुटणार
आमदार गणेश नाईकांच्या सूचनेप्रमाणे होणार कामांची पडताळणी नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 111 प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाजसेवकांनी प्रभागनिहाय आवश्यक समस्या आणि नागरी कामांची लेखी निवेदने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर केली. या वेळी लोकनेते आमदार नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण …
Read More »‘समृद्धी’च्या फोटोग्राफीचा लक्ष्मण ठाकूर यांना मान
पनवेल : रामप्रहर वृत्त विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाची शासकीय फोटोग्राफी दै. रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर व सहकार्यांनी केली आहे. लक्ष्मण ठाकूर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चार दिवस टीमसमवेत समृद्धी …
Read More »पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र पाटील यांना वाढता पाठिंबा
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजू लागले असून, पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सदानंद पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले जितेंद्र …
Read More »कृतज्ञता सप्ताह सांगता समारंभाच्या तयारीचा आढावा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली पाहणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताहा अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ …
Read More »पदपथावर अवैध धंदे, पार्किंगची समस्या
पनवेलमध्ये वाहतूक शाखेची कारवाई सातत्याने व्हावी; नागरिकांची मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पदपथावरील अवैधधंदे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. एखादा अपघात झाल्यावरच त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. नवीन पनवेलमध्ये …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त वैज्ञानिक प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात संधी मिळाली असून त्यांच्या भरारीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून बळ दिले आहे. प्रज्ञेश म्हात्रे हे युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहेत. श्री. रामशेठ …
Read More »कर्जतमध्ये एक्स्प्रेस गाड्यांना पूर्ववत थांबा द्यावा,
भाजपचे सुनील गोगटे यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची तसेच विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होते. भाजप किसान मोर्चाचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेऊन कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper