Breaking News

महत्वाच्या बातम्या

करोटी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत पेण ः प्रतिनिधी अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन

सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण अलिबाग ः प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे …

Read More »

गुरू नानक जयंतीनिमित्त कळंबोलीत विशाल नगर कीर्तन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त बंधू भाव, एकात्मता सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 533वी जयंत्ती मंगळवारी (दि. 8) आहे. त्यानिमित्त रविवारी कळंबोली गुरुद्वाराच्या वतीने विशाल नगर किर्तनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …

Read More »

पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे पतीची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर कामोठ्यातील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग …

Read More »

पनवेलमधील साई वर्ल्ड सिटी प्रकल्प पूर्ण

मान्यवरांच्या उपस्थितीत 800 रहिवाशांना चावी सुपूर्द पनवेल : प्रतिनिधी पॅराडाईज ग्रुप साई वर्ल्ड सिटी फेज ’वन’च्या यशस्वी पूर्ततेनंतर 800 भाग्यवान रहिवाशांसाठी चावी-हँडओव्हर समारंभाला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व लोकनेते रामशेठ ठाकुर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) उपस्थित राहून  पॅराडाइज ग्रुपचे संस्थापक तथा साईभक्त मनीष भातिजा यांना शुभेच्छा …

Read More »

रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र कमी होतेय!

विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …

Read More »

कल्याणकारी कौल

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्‍या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …

Read More »

माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा

माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …

Read More »

वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे

सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …

Read More »

मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण

मुरूड ः प्रतिनिधी     मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना …

Read More »