Breaking News

महत्वाच्या बातम्या

सिडकोतर्फे 4158 सदनिकांसह वाणिज्यिक गाळे आणि कार्यालये विक्रीची योजना

नवी मुंबई ः बातमीदार सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा …

Read More »

ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती रॅली

पनवेलमध्ये महिलांसाठी ‘रोटरी’चा उपक्रम पनवेल ः वार्ताहर येथील रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या वतीने पनवेलमध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. अर्चना परेश ठाकूर यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. या उपक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, …

Read More »

माणगावात वर्षातून तीनदा भातपीक घेण्याचा प्रयोग

माणगाव ः प्रतिनिधी माणगावमधील एका उद्योजक शेतकर्‍याने वर्षातून तीन वेळा भाताचे उत्पादन घेण्याचा निश्चय केला आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यावर माणगाव तालुका हा भाताचे विक्रमी उत्पादनाचे कोठार म्हणून ओळखला जाणार आहे. कोकणातील शेतकरी पावसाच्या पडणार्‍या पाण्यावर अवलंबून असून इथली भातशेती एकपिकी असल्याने बहुतांशी तरुणवर्ग मुंबई, सुरतमध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित …

Read More »

धाटाव एमआयडीसीत चार कामगार भाजले

एक्सेल कंपनीत दुर्घटना, एकाची प्रकृती चिंताजनक धाटाव ः प्रतिनिधी रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कारखान्यात काम करीत असताना आगीच्या ज्वाळा अंगावर आल्याने चार कामगार जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  एक्सेल इंडस्ट्रीज लि.मध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कारखान्यातील ड्रममधून घातक मटेरियल बाहेर काढत असताना …

Read More »

बिस्किटच्या बॉक्समधून गांजाची वाहतूक; 26 किलो गांजा जप्त

नेरळ पोलिसांनी कारचा पाठलाग करून एकाला पकडले कर्जत ः बातमीदार बिस्किटच्या बॉक्समधून गांजाची वाहतूक करणारी एक कार नेरळ पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना घडली. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन सूत्रधार पळून गेला, मात्र कारचालक पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 26 किलो गांजा जप्तकेला आहे.अनंत …

Read More »

पनवेलमध्ये महाविकास आघाडीला लागली गळती

राष्ट्रवादी, शेकापच्या पदाधिकार्‍यांचा समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश पनवेल ः वार्ताहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील अर्जुन डांगे यांनी रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. शिवसेना नेते …

Read More »

दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रकचा अपघात

नवी मुंबई : बातमीदार दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना ठाणे बेलापूर मार्गावर दुपारी 3 च्या सुमारास घडली. सुदैवाने गर्दी नसल्याने व अपघात उड्डाणपुलाच्या खाली झाल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. या अपघातात सुधाकर मढवी असे …

Read More »

चोरी प्रकरणात दोघांना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (25) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून चार मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस …

Read More »

तब्बल 36 ठिकाणी मृत्यूचा सापळा

नवी मुंबई वाहतूक विभागाने शोधले अपघातप्रवण क्षेत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणार्‍या अपघातांमधील मृतांची संख्या अधिक असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तीन महिन्यांपूर्वीच नवी मुंबई वाहतूक विभागाच्या …

Read More »

भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन 

पनवेल : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्वाचा असेल, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्च्याच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि …

Read More »