Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पेणचे संजय मोकल

पेण : प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार्‍या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पेणचे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ …

Read More »

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (दि. 11) टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा कर्णधार, तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक …

Read More »

रायगडात मंगळवारपासून गौरा गणेशोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन होत आहे. साधारणतः दीड दिवसाच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणार्‍या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेशमूर्तीची …

Read More »

खारघरमध्ये स्कूल बसला आग

विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्‍या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना …

Read More »

प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022मध्ये संपत आहे,  मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात …

Read More »

खारघरमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण

खारघर ः रामप्रहर वृत्त खारघरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक …

Read More »

पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन अभियान

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग  निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली. मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक …

Read More »

नैसर्गिक आपत्तीबाधित गावांचे होणार पुनर्वसन

सर्वसमावेशक धोरण निश्चितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीत निर्माण होणार्‍या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास सोमवारी (दि. 11) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, भूस्खलन …

Read More »

‘लम्पी’वर स्वदेशी लस तयार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यतंरी कोरोनावर मात करणार्‍या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेयरी समिटच्या उद्घाटन समारंभात बोलत …

Read More »

निर्माल्यापासून करणार नैसर्गिक खत निर्मिती

नवी मुंबई मनपाचा पुढाकार; 38.795 टन निर्माल्य संकलित नवी मुंबई ः बातमीदार  अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत 15 हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे 134 कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या कलशातच टाकावे या महापालिकेने केलेल्या आवाहनालाही उत्तम …

Read More »