Breaking News

महत्वाच्या बातम्या

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी

मंदिरात फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई पाली : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी  मंगळवारी (दि. 13) पालीत भाविकांची गर्दी उसळली होती. श्री. बल्लाळेश्वराची मूर्ती फुलांनी सजवली होती तर  मंदिर व परिसरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अष्टविनायकांपैकी पाली हे एक प्रख्यात धार्मिक स्थळ आहे. संकष्टी चतुर्थीच्या …

Read More »

कर्जत वडवली येथील दिव्यांग विद्यार्थ्याला व्हीलचेअर भेट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वडवली प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी सार्थक सावंत याला नवी मुंबईतील श्री साई ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने व्हीलचेअर भेट दिली. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांनी शिफारस केली होती. श्री साई ट्रस्टकडून गेली 10 वर्षे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य सुरु आहे. सार्थक …

Read More »

कर्जत-रसायनी बस सुरु करावी

विकास संघर्ष समितीचे आगार प्रमुखांना निवेदन कर्जत : बातमीदार खालापूर तालुक्यातील रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात कर्जत येथून जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी बस गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी कर्जत विकास संघर्ष समितीने येथील एसटी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला कर्जत आगारानेही साकारात्मक …

Read More »

पेणमधील अमन स्टार बेकरी बंद; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पेण : प्रतिनिधी शहरातील एका हॉटेलमधील पावामध्ये उंदराची विष्टा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वि. श्री. निकम यांनी रामवाडी येथील अमन स्टार बेकरी बंद करण्याचे लेखी निर्देश देऊन बेकरी मालकाला 20 हजारांचा दंड ठोठावला. तर विशाल बेकरी मालकास नोटीस देऊन बेकरी बांधकामात आणि …

Read More »

चोरीच्या रिक्षा विकणारी टोळी जेरबंद

12 रिक्षा जप्त, तीन आरोपींना अटक; माणगाव पोलिसांची कामगिरी माणगाव : प्रतिनिधी चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्‍या टोळीतील तिघाजणांना माणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण 12 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या  असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (दि.13) पत्रकार परिषदेत दिली. माणगाव उतेखोलवाडी येथील प्रवीण प्रदीप …

Read More »

बोर्ली व कोर्लई येथील जनावरांमध्ये लॅम्पीची लक्षणे

पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत मुरूड  तहसीलदारांचे आवाहन मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ली व कोर्लई गावातील काही जनावरांच्या अंगावर गाठी येणे अशी लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. अशी जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मुरूड तहसीलदार व पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती,  सरपंच, ग्रामसेवक व …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात सौंदर्यासंदर्भात जागरूकता कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लॅक्मे अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 10) सौंदर्य क्षेत्रातील जागरूकता याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी खारघर येथील लॅक्मे अकॅडेमीच्या केंद्रप्रमुख शाल्मली करंजेकर प्रमुख अतिथी लाभल्या. …

Read More »

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन

पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची पोलीस स्टेशनमध्ये स्थापना करण्यात आली होती. नुकतेच खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील गणेशाचे विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. सतत जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस बांधव दिवस-रात्र आपले कर्तव्य निभावत असतात. गणेशाची स्थापना केल्यामुळे सर्व पोलीस …

Read More »

कामोठ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी-शिक्षक दिन उत्साहात साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांनी इतर …

Read More »

उरण पालिकेकडून निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य तलावात न टाकता गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती. नगर परिषदेने विमला आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे. यासाठी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका …

Read More »