Breaking News

महत्वाच्या बातम्या

फुंडे विद्यालयात वाजेकर यांची जयंती

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे फुंडे येथील वीर तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात तालुक्यांतील शिक्षण महर्षी वीर तु. ह. वाजेकर यांची 115 वी जयंती बुधवारी (दि. 6) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मिठागर युनियन कार्यालयातील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. वीर तु. ह. वाजेकर सामाजिक संस्थेच्या वतीने कर्मवीर …

Read More »

शेतकर्यांसाठी भात शेती, मत्सपालन प्रशिक्षण

खारघर : प्रतिनिधी पनवेल येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खारजमीन संशोधन केंद्र पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीमध्ये मत्स्य पालनाचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. मत्साशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. भातशेतीतील मत्स्य संवर्धनाचे फायदे, माशांचे आहारातील महत्व, मत्स्य व्यवसायापासून रोजगार निर्मितीची संधी, …

Read More »

पावसाळी पर्यटनावर पोलिसांचा वॉच

अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त पनवेल : वार्ताहर पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मोठी रांग पनवेल तालुक्यातील  परिसरातील गाढेश्वर धरण, माची प्रबळ, मोरबे धरण कुंडी धबधबा, शांतीवन नदीपात्र, गाढी नदीकडे लागते. त्यामुळे यावर्षी 10 पोलीस अधिकारी आणि 19 अंमलदारांचा बंदोबस्त राहणर असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी …

Read More »

पावसाळ्यानंतर बंदर रोड व विट सेंटर येथील खड्डे बुजविणार -मुकित काझी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील बंदर रोड व विट सेंटर येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी येथील नगरसेवक मुकित काझी यांच्याकडे केली आहे. यावर पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकित काझी यांनी सांगितले आहे. या मोहल्ला परिसरात …

Read More »

रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ

नागरिकांना सतर्कतेचा इशारा; जुना पूल वाहतुकीस बंद रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने तीन दिवस हजेरी लावल्याने कुंडलिकेच्या पात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे बुधवारी कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहत होती. नागरीकांनी काळजी घ्यावी यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, बुधवारी दुपारी जुन्या रोहा अष्टमी …

Read More »

उरण पं. स.च्या शिक्षण विभाग इमारतीला गळती

शॉर्टसर्किटमुळे कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका उरण : प्रतिनिधी उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शॉक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कार्यालयात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने …

Read More »

विस्कटलेली मने

महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर झाल्यानंतर राजकारणाला वेगळीच दिशा मिळणे स्वाभाविकच होते. अचानक झालेल्या पक्षांतर्गत उठावानंतर शिवसेनेचे गलबत खडकावर आपटून त्याच्या ठिकर्‍या होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच उठावाची पहिली ठिणगी पडली होती असा गौप्यस्फोट सांगोल्याचे ‘झाडी, डोंगर’फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. …

Read More »

खारघरमधील धोकादायक वृक्षांची छाटणी करावी

भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांचे निवेदन खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरामध्ये असणार्‍या धोकदायक वृक्षांची छाटणी पथके तयार करून करावीत, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. …

Read More »

उसर्ली खुर्दच्या दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखल

बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले पनवेल ः वार्ताहर  उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी  अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍या बिल्डरांचेही धाबे …

Read More »

पोलादपूर तालुक्यात ’वलगण’ आली!

चढणीचे मासे पकडण्यासाठी मत्सप्रेमींची लगबग पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागली असून या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्‍या माशांची वलगण लागली आहे. ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, …

Read More »