Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान मोदींच्या लोकार्पण

मुंबई ः प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून त्याचे सोमवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच राष्ट्रीय महामार्ग आणि सात रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त योगासने व स्वच्छता मोहीम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त मंगळवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार असून योग दिनाचे औचित्य साधून प्रबळगड येथे स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागणार! 

सिडको घेराव आंदोलनाची नवी मुंबईतही जोरदार तयारी नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित 29 गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी …

Read More »

माणगावमध्ये गावठी बॉम्ब आढळले; दुकलीला अटक

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी (दि. 19) रात्री तेथे जाऊन पाहणी …

Read More »

पनवेल झोपडपट्टीमुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा

महामार्गावरील अंधारही होणार दूर; महासभेत मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टीमुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलमध्ये भरपूर हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला रोज बाजार उपलब्ध होणार आहे. घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार असून सायन-पनवेल महामार्गावरील अंधार दूर …

Read More »

पराग बोरसे झाले अमेरिकेतील संस्थेचे सदस्य

पहिले भारतीय चित्रकार कर्जत : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे (कर्जत) यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.  हा सन्मान मिळवणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी …

Read More »

मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची निवडणूक वॉर्डनुसार व्हावी; सभासदांची मागणी

मुरुड : प्रतिनिधी तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या वॉर्ड रचनेबाबतची सुनावणी रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अलिबाग कार्यालयात मंगळवारी (दि. 21) घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे सभासद जनार्दन कंधारे, भाजपचे तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी विक्री संघाचे  …

Read More »

प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 800 झाडे लावण्याचा जि.प.चा संकल्प

अलिबाग : प्रतिनिधी कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 800 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 802 ग्रामपंचायती असून, त्यामध्ये सहा लाख 41 हजार 600 वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

वरुणराजाचा बळीराजाला दिलासा

अलिबाग : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. 20) सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे सर्वाधिक  65 मिमी पावसाची नोंद झाली. 20 तारखेपर्यंत सरासरी 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत काही …

Read More »

खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर

सुधागडात गाबोळीच्या माशांना अधिक पसंती पाली : प्रतिनिधी समुद्रातील मासेमारीवर बंद असल्याने खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. सुधागड तालुक्यातील बाजारांत सध्या गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून, त्यातील गाबोळीच्या (पोटात अंडी असलेल्या) माशांना अधिक पसंती दिली जात आहे. बाजारात विक्रीस आलेले गाबोळीचे मासे हातोहात संपत …

Read More »