Breaking News

महत्वाच्या बातम्या

नारंगी ग्रामस्थांच्या हरकतीवर कोकण भवनात होणार सुनावणी

सावरोली, आत्करगाव जिल्हा परिषद प्रभाग रचनेस ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022च्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सावरोली आणि आत्करगाव या प्रभाग रचनेस नारंगी गावातील काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवित हरकत घेतली आहे. या अनुषंगाने कोकण भवन या ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आली आहे. रायगड जि. …

Read More »

मुरूडमध्येे वीजचोरी; पाच जणांवर कारवाई; नागरिकांनी बिल भरणा करण्याचे वीज वितरणचे आवाहन

मुरूड जंजिरा : प्रतिनिधी बिल जास्त येऊ नये म्हणून वीजग्राहक विविध क्लुप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत असतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे याकरिता वीज वितरणच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरूड तालुक्यात कल्याण व पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी …

Read More »

समुद्र खवळला; बुधवारी मोठी भारती

अलिबाग : प्रतिनिधी रायगडच्या समुद्रकिनार्‍यावर बुधवारी (दि. 15) मोठी भरती आली होती. या वेळी समुद्र प्रचंड खवळला होता. फेसाळणार्‍या महाकाय लाटा किनार्‍यावर  धडकत होत्या. या लाटांचा आस्वाद लुटण्यासाठी स्थानिक तसेच पर्यटकांनी अलिबाग किनार्‍यावर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, गुरुवारी समुद्राला या वर्षीचे सर्वांत मोठे उधाण येणार आहे. मान्सूनने आपली दस्तक …

Read More »

पनवेलमध्ये ‘रॉकस्टार’ थिरकले!

धमाल डान्स शोला जबरदस्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त रंगमंचावर एकाहून एक सरस नृत्य सादर करणारे कलाकार… त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणारे पालक… मान्यवरांची उपस्थिती अन् त्यांच्याकडून कौतुकाची थाप… अशा अतिशय उत्साही वातावरणात रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल 2022 डान्स शो मंगळवारी (दि. 14) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …

Read More »

कर्जतमध्ये वादातून युवकाचा खून, आरोपीला अटक

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना भागातील एका इमारतीमध्ये 24 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून व रॉडच्या साहाय्याने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. हा खून आपापसातील वादातून झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वेपट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती …

Read More »

महाड, पोलादपूरमध्ये यंदाही दरडींचा धोका

महाड : प्रतिनिधी गेली काही वर्षांत महाड आणि पोलादपूर तालुक्यांत दरडी, भूस्खलन आणि पुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे यंदा तालुका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली असून संभाव्य दरडग्रस्त गावांत संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हे अधिकारी हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2022-23ला बुधवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल  सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबिर

नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी) व थल सैनिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 5 ते 14 जून 2022दरम्यान झाले असून यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. …

Read More »

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) वतीने आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात आयोजित प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुंबईतील पोदार आयुर्वेदिक  महाविद्यालयाचे डीन  डॉ. जी. एस. खटी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले. या वेळी ’एनएसओ’च्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय, महाराष्ट्र शासनाच्या अर्थशास्त्र व् सांख्यिकी …

Read More »

काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराचे गुलाम

भाजपचे रामचंद्र घरत यांचा घणाघात नवी मुंबई : बातमीदार देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणार्‍या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रामचंद्र घरत यांनी केले आहे. …

Read More »