Breaking News

महत्वाच्या बातम्या

अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहात अग्नितांडव

अलिबाग : प्रतिनिधी अलिबामधील पीएनपी नाट्यगृहाला बुधवारी (दि. 15) दुपारी भीषण आग लागली. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या बंबांनी शर्तीचे प्रयत्न करून दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. या नाट्यगृहाचे लोकार्पण 7 जुलै 2017 …

Read More »

दरडग्रस्तांची पुनर्वसन संकुले झाली जीर्ण

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिद्धिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. मात्र, तेथे दरडग्रस्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यापूर्वीच या संकुलांचा जिर्णोध्दार करण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे पोलादपूर तालुका सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पुनर्वसनास वंचित राहिला आहे. 25 व 26 …

Read More »

खारघर शहराला पाणीपुरवठा वाढला

भाजपच्या सिडको काम बंद आंदोलनाला यश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकार्‍यांचे नागरिकांनी मानले आभार खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवली होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार सिडकोकडे भाजपकडून करण्यात आले. याकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने …

Read More »

चोंढी येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप

  अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. महानगर गॅस कंपनीच्या सीएसआर फंडातून आई फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक सुशांत राऊत,  रायगड जिल्हा अपंग संस्थेचे अध्यक्ष साईनाथ पवार, आई फाउंडेशनचे राजू साळुंखे, महानगर गॅसच्या …

Read More »

गणवेश खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची बाजारात गर्दी

कर्जत : बातमीदार कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. 15 जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थी कर्जत व नेरळमधील दुकानांत गर्दी करीत आहेत. दोन वर्षांनंतर लहान मुले प्रत्यक्ष शाळेत जात असल्याने गणवेश खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. तालुक्यातील कर्जत आणि नेरळ …

Read More »

पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

अलिबाग : रामप्रहर वृत्त जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

माणगाव दाखणे गावात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षवाटप

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील दाखणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे यांनी मंगळवारी (दि.14) सकाळी वटपौर्णिमेचे औचित्य साधून ग्रा.पं.च्या वतीने एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम हाती घेत खर्डी गावातील जवळपास 80 महिलांना वडाच्या वृक्षाचे वाटप केले. माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, …

Read More »

पनवेल, उरण परिसरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव

जासई विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव व इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय …

Read More »

मंगेश वाघमारेंच्या अपघाताची सखोल चौकशीची मागणी

पाली : प्रतिनिधी पालीतील विश्रामगृहात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी उशिरा सुधागड तालुक्यातील सर्व पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचा पाली-खोपोली मार्गावर खालापूर तालुका हद्दीतील तुकसई गावाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. हा अपघात व मृत्यू संशयास्पद …

Read More »

पेण एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांचे स्वागत

पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटाला दूर सारत नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. बुधवारी सुरु झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.  पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षिका अपर्णा वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन म्हात्रे आदींनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून …

Read More »