पनवेल : वार्ताहर मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने आरोपीस धक्का दिला असता झालेल्या झटापटी मध्ये महिलेच्या गळ्यातील डोरली तुटून नुकसान झाले. त्याबद्दल संबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला …
Read More »आंब्याच्या दुकानाला आग
जिवीतहानी नाही, मात्र मोठे नुकसान पनवेल : वार्ताहर शहरातील एका आंब्याच्या दुकानाला अचानकपणे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या जवळील जय भारत नाक्यावरील एका आंब्याच्या दुकानाला सोमवारी (दि. 9) रात्री आग लागली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी आली व जवानांनी …
Read More »आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहा
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे पोलीस पाटलांना आवाहन पनवेल : वार्ताहर पोलीस पाटील हे खर्या अर्थाने त्या गावाचे पोलिसच असतात त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चाललेय याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी, असे आवाहन परिमंडळ 2 …
Read More »माडप येथे आरोग्य तपासणी, दाखले वाटप शिबिर
खोपोली : प्रतिनिधी आदिवासी सप्तसूत्री व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत माडप येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांसाठी दाखले वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या …
Read More »कर्जतमध्ये महापुरुषांच्या नावाच्या पाट्या
कर्जत : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तब्बल 50 लाख खर्चून कर्जत शहरात महापुरुषांच्या नावांचे 190 फलक लागले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये मोठे नामांकन मिळविण्यासाठी कर्जत शहराचे हे बदललेले रूप महत्वाचे ठरणार आहे. कर्जत शहरात आलेल्या नवख्या माणसाला निश्चित स्थळी जाण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी पालिकेने केलेल्या कामाचे …
Read More »कोंढाणे धरणाच्या पाणीवाटपावरून तिढा
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे उल्हास नदीवर मोठे धरण बांधण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे, मात्र या धरणातील पाणी राज्य शासनाने नवी मुंबईमधील नैना गृहप्रकल्पांसाठी सिडकोला देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत तालुक्याजवळ असलेले मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकल्यानंतर तेथे असलेल्या नदीमध्ये नवी मुंबई महापालिका एक थेंबदेखील पाणी सोडत …
Read More »महावितरणकडून बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा ‘शॉक’; ग्राहकांमध्ये संताप
पेण : प्रतिनिधी महावितरणने ग्राहकांना भर उन्हाळ्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा शॉक दिला आहे. पेण तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणाकडे जमा करावी लागणार आहे. मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत पेण तालुक्यातील महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बीले देण्यात आली आहेत. …
Read More »रस्ता पूर्ववत करण्यासाठी कर्जत बेडीसगावमधील आदिवासींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
अलिबाग, कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार गावातील वहिवाटीचा रस्ता काही लोकांनी जेसीबी लावून उखडून टाकला आहे. तो रस्ता पूर्ववत करून मिळावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील बेडीसगाव व आसपासच्या नऊ वाड्यांमधील आदिवासी सोमवारपासून (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कर्जत तालुक्यातील बेडीसगावातून रस्ता जातो. हा रस्ता नऊ आदिवासी वाड्यांना …
Read More »जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा रॅम्प तोडल्यामुळे रुग्णांचे हाल
अलिबाग : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या रॅम्पचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या लिफ्टच्या पॅसेजमध्ये पावसाच्या कालावधीत पाणी साठते. त्यामुळे लिफ्ट बंद ठेवावी लागते. पावसाळ्यात रॅम्प नसेल …
Read More »पाथरज ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरिराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज गावात 80 ते 85 घरांची लोकवस्ती आहे. गावासाठी आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद सेस फंडातून विहीर बांधण्यात आली आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper