Breaking News

महत्वाच्या बातम्या

अतिवृष्टीबाधित पाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

महाडमधील 72 नळ पाणीपुरवठा योजना, 14 विहिरी आणि तलावांचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरात  शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील बाधित झाल्या होत्या. अनेक गावातील पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी …

Read More »

खारभूमी कामाच्या यंत्रसामुग्रीमुळे पेण भाल येथील घराला तडे

नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट विभागाच्या नारवेल, खारभुमी योजने अंतर्गत भाल-विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारणाचे काम सुरू आहे. त्यासाठी येणार्‍या मोठमोठ्या यंत्र सामुग्रीमुळे राजेंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या भाल येथील घराला जागोजागी तडे गेले असून घराचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची प्रशासनाने तातडीने पाहणी करुन नुकसान …

Read More »

माणगावमध्ये एसटी येतेय पूर्वपदावर

70 टक्के बससेवा सुरू माणगाव : प्रतिनिधी आपल्या मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते . माणगाव बस आगारातील सुमारे 82 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हे कर्मचारी टप्याटप्याने कामावर हजर होऊ लागल्याने माणगाव एसटी आगाराची सत्तर टक्के सेवा सुरु झाली आहे. संपापूर्वी माणगाव एसटी आगाराच्या लोकल …

Read More »

खोपोली नगर परिषद हद्दीत पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी सध्या खोपोली शहरातील अनेक भागात त्याचप्रमाणे आदिवासी वस्तीत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. नगर परिषद प्रशासन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असला तरी, भविष्यात नगर परिषदेने पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. विशेषत: नगरपालिका हद्दीतील काही आदिवासी वाड्या टेकडीवर असल्याने, अनेकदा त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत …

Read More »

अलिबागमधील भूमिगत विद्युतवाहिन्या प्रकल्प रखडला!

अलिबाग शहर तसेच शेजारील  चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य  देण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.  या प्रकल्पाला मंजुरी मिळून सहा वर्षे झाली तरी देखील हा प्रकल्प कार्यान्वीत झालेला नाही. सध्या या प्रकल्पाचे काम  सुरू …

Read More »

सागर म्हात्रे ठरला मराठी इंडियन आयडॉल

पनवेल, उरणसह रायगडचे नाव उंचावले उरण : प्रतिनिधी, वार्ताहर, बातमीदार पनवेलजवळील करंजाडे येथे राहणारा आणि मूळचा उरण तालुक्यातील कोप्रोली येथील गायक सागर विश्वास म्हात्रे याने सोनी मराठी टीव्ही वाहिनीवरील मराठी इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचा पहिला विजेता होण्याचा बहुमान पटकाविला. मराठी इंडियन आयडॉलचा किताब पटकाविल्याने सागरवर पनवेल, उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून …

Read More »

रायगडात अवकाळी पावसाचा शिडकावा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात काही भागांमध्ये गुरुवारी (दि. 21) अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र अवकाळी पाऊस बागायतदारांना नुकसानदायक ठरू शकतो. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळी रायगड लिल्ह्यात अवकाळी पावसाचा …

Read More »

‘ती’ आत्महत्या नव्हे; तर अनैतिक संबंधातून हत्या!

कर्जत धोत्रेवाडीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलले कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी येथील आदिवासी तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कर्जत पोलिसांनी त्याच गावातील तरुणाला अटक केली आहे. आरोपीने अनैतिक संबंधातून या तरुणीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेवाडीमधील 17 वर्षीय आदिवासी तरुणी पिंकी गणेश मांगे या …

Read More »

शुक्रवारपासून आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

 पनवेलमधील धरणा कॅम्प येथे घुमणार दम  प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश  मान्यवरांची लाभणार उपस्थिती; दर्शकांना पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा …

Read More »

कोरोना काळात मविआ सरकारचा मंत्र्यांच्या उपचारावर लाखोंचा खर्च

चक्क सरकारी तिजोरीतून भरली बिले;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे वृत्त झी 24 तास वाहिनीने …

Read More »