Breaking News

महत्वाच्या बातम्या

टोकेखार-सावली रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टोकेखार-सावली रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरातील दगड व मातीचे थर रस्त्यावर येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुरूड-रोहा मार्गावरील टोकेखार ते सावली या भागात मोठा डोंगर असून तो रस्त्यालगतच आहे. दरवर्षी …

Read More »

आरपीएलमधील चार खेळाडू महाराष्ट्र संघात

कर्जत ः बातमीदाररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत असलेल्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी हे चार खेळाडू रायगडचे  प्रतिनिधित्व करतील.उरण येथील जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर 25 वर्षाखालील टी-20 स्पर्धा सुरू आहे. या …

Read More »

नवी मुंबईत अद्यापही मैदानी खेळांना बंदी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील उद्याने, मैदाने खुली झाली मात्र ती फक्त ठरावीक वेळत चालने, व्यायाम, सायकलिंगसाठीच, मात्र खेळांसाठी मैदाने बंदच आहेत. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न विचारला जात असून मैदाने खेळांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. खरंतर याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित असताना नवी मुंबईतील …

Read More »

तुळशीविवाह उरणमध्ये उत्साहात

उरण : वार्ताहर दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच तुळशीविवाह, तुळशीविवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. उरण तालुक्यातील ठिक-ठिकाणी तुळशीविवाहाला सुरुवात झाली आहे. एकादशीपासून सुरू होणारे हे विवाह पाच दिवस चालतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. उरण तालुक्यात तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुळशीविवाहापूर्वी …

Read More »

काकाजीनीवाडी येथे रंगणार फॅशन शो

पनवेल : वार्ताहर आयएनआयएफडी पनवेलच्या माध्यमातून यंदाही येत्या 4 डिसेंबर रोजी पनवेलजवळील काकाजीनीवाडी येथे फॅशन इंडिया डिझायनिंगचा सोल संसेशन 3.0 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डायरेक्टर सुरेंद्रसिंग जट्टी यांनी दिली आहे. या वेळी बोलताना जट्टी यांनी सांगितले आहे की, सहा वर्षापूर्वी ही संस्था आम्ही सुरू केली होती. त्यावेळी …

Read More »

मोरा जेट्टीसह परिसरातील सुविधांची दुरवस्था; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

उरण : वार्ताहर उरण येथील मोरा जेट्टीची दुरवस्था झाली असून मेरी टाइम  बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रवाशाच्या सुखसोईंकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. त्याकडे मेरी टाइम बोर्डने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहे. मोरा जेट्टीलगत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली …

Read More »

एपीएम टर्मिनल्सची साप्ताहिक आंतर-आशिया सेवा सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावानेही ओळखल्या जाणार्‍या एपीएम टर्मिनल्स मुंबईने नवीन साप्ताहिक आंतर-आशिया सेवा कार्यान्वित केली आहे. आरडब्ल्यूए1 (आरसीएल फीडर्स चायना-वेस्टर्न इंडिया सर्व्हिस) या नावाने ओळखली जाणारी सेवा आरसीएल फीडर्स, पॅसिफिक इंटरनॅशनल लाईन्स, सीयू लाईन्स आणि इंटर एशिया लाईन्स यांच्यातर्फे आरसीएल फीडर्सच्या बरोबर 35 …

Read More »

नवी मुंबईतही उद्यानांची सुरक्षा वार्‍यावर

नवी  मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईची ओळख उद्यानाचे शहर अशी होत असताना या उद्यानांत गर्दुल्ले व मद्यपींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ऐरोली सेक्टर 4 मध्ये उच्च विद्युतवाहिनी खाली छत्रपती संभाजी महाराज उद्यान पालिकेने विकसित केले आहे. उद्यानात वयोवृद्धांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी दुपारी, …

Read More »

तळोजातील मैदानात अमली पदार्थांचे सेवन

खारघर : प्रतिनिधी तळोजा सेक्टर 10 मधील मैदानात पथदिवे बंद असल्यामूळे रात्रीच्या वेळी काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन  करीत असल्याचे प्रकार सुरू आहे. या मैदानात खेळणी असल्यामुळे मुले खेळत असतात. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 …

Read More »

उसर्ली खुर्दमधील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई; ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सिडकोचे आश्वासन

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नैना क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन सिडको नैनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या परिसरात असंख्य इमारती उभ्या राहिल्या असून अनेक …

Read More »