Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पांडवकड्यावर पर्यटकांवर कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील पांडवकड्यावर बंदीचे आदेश असूनदेखील बंदी झुगारणार्‍या पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचालून 12 पर्यटकांना अटक करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. या पूर्वी 29 पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली होती. विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी या 12 पर्यटकांपैकी काही पर्यटक वाहून जात असताना खारघर पोलिसांनी …

Read More »

रिक्षा थांब्यांना पयार्र्यी जागा उपलब्ध करून द्यावी

भाजप युवा मोर्चाची महानगरपालिकेकडे मागणी; वाहतूक पोलिसांना सहाय्यक देण्याचीही सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी रिक्षा थांब्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 25) महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आली, तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना पालिकेने सहाय्यक कर्मचारी पुरवावेत, …

Read More »

आंब्रे कुटुंबीयांना शासकीय मदतीचा धनादेश

पनवेल : प्रतिनिधी उमरोली येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आदित्य आणि सारिका आंब्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 25) पनवेल तहसील कार्यालयात हा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पनवेल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9 जुलै रोजी …

Read More »

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदाच्या गणेशमूर्ती

पनवेल ः बातमीदार गणेशोत्सवाला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून गणेशमूर्ती बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार …

Read More »

नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास मार्चपासून

उरण ः रामप्रहर वृत्त रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर शासनाने भर दिला असून नेरूळ ते भाऊचा धक्का जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. नेरूळ जेट्टीचे निम्मे काम पूर्ण झाले असून मार्च 2020 पर्यंत जलप्रवासासाठी जेट्टी तयार असेल, असा विश्वास सिडकोने दाखविला आहे. त्यामुळे पुढील वर्षांत नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास फक्त …

Read More »

मासेमारीला होणार 1 ऑगस्टपासून सुरुवात

उरण ः रामप्रहर वृत्त शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. फक्त 12 दिवसांचाच अवधी उरल्याने पर्सिसीयन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्‍या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी …

Read More »

वर्गमित्रावर चोरी करण्यासाठी दबाव?

पनवेल : कामोठे सेक्टर 34 येथील एका कॉन्व्हेंट शाळेत नववीत शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अशाप्रकारे या पीडित विद्यार्थ्यांने आपल्या घरातून दोन लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरी …

Read More »

कळंबोलीकरांचा वळसा वाचवण्यासाठी भाजपचा पाठपुरावा

महामार्ग, सर्व्हिस रोडला जोड रस्ता करा; कळंबोली शहर भाजपचे सिडको अध्यक्षांना साकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे, तसेच पनवेल-सायन महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता थेट शिवसेना शाखेजवळील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे दीड ते दोन किमी वळसा घालावा लागत आहे. दोन्ही वसाहतीतील रहिवाशांची गैरसोय टळावी याकरिता कळंबोली भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे.  यासंदर्भात …

Read More »

नवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करा

महापौरांचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 24) दिले. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि सिडको अधिकार्‍यांची बैठक महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी दुपारी 2 वाजता महापालिका मुख्यालयात बोलावली …

Read More »

‘सावधान’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त एनसीजी एंटरटेंमेंटची निर्मिती असलेला ‘सावधान-एक अद्भुत कहानी’ हा हॉरर हिंदी चित्रपट शुक्रवारी (दि. 26) प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नवीन पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार …

Read More »