Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

भिंगारवाडी बसथांब्याजवळ पाणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील भिंगारवाडी बस थांब्याजवळ चार फूट खोल पाणी साचले होते. पावसाचा जोर कायम असल्याने हे पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक प्रवाशांनी बाहेर पडणे टाळले. पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी (दि. 27) बस बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या वेळी भाजपचे पळस्पे युवा मोर्चा …

Read More »

पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. …

Read More »

चारचाकी गाडी जळाली

पनवेल ः नवीन पनवेल ते खांदा कॉलनी येथील उड्डाण पुलावर एका चारचाकी गाडीला आग लागल्याने या आगीत गाडी जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लक्षात आल्यानंतर समोरच्या इमारतीत राहणार्‍या राहुल भीमराव पवार या युवकाने दूरध्वनीवरून अग्निशमन दलाला दिली. खांदा कॉलनीच्या दिशेने जाणारी वेगनआर गाडी …

Read More »

अडीच लाखांची फसवणूक

पनवेल : ट्रान्स्पोर्टची बिले काढून त्याची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता स्वतःच्या खात्यात भरून दोघा जणांनी अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्णानंद जनार्दन कोळी (वय 38) यांचा ऋषीप्रसाद ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून बीमा कॉम्प्लेक्स स्टील मार्केट कळंबोली येथे कार्यालय आहे. त्यांनी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी

पनवेल ः शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.

Read More »

कामोठ्यात स्वाइन फ्लूने मृत्यू

पनवेल ः बातमीदार पनवेलमधील कामोठे शहरात स्वाइन फ्लूची लागण होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर आणखी एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. कामोठे शहरातील सेक्टर 17 येथील जिजाऊ सोसायटीत राहणारे नाना बजाबा सहाणे यांचे दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे निधन झाले. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना …

Read More »

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

मोहपाडा ः रामप्रहर वृत्त रसायनीतील मोहोपाडा शिवनगर येथील पत्रकार राकेश खराडे यांचा मुलगा सार्थक (वय 6 वर्षे साडेतीन महिने) याला रविवारी 7 नंतर अचानक ताप येऊन उलटीचा त्रास झाला. या वेळी सार्थकला आई-वडिलांनी जवळपासच्या एका हॉस्पिटलातील डॉक्टरला दाखवून अ‍ॅडमिट केले. डॉक्टरने सार्थकला सलाईन लावली, परंतु सलाईन चालू असताना सार्थकला आकडी …

Read More »

गांधर्व महाविद्यालय संकुलाचा विस्तार

नवी मुंबई : समाजातील सर्वांना अल्पशा शुल्कामध्ये संगीताचे शिक्षण मिळावे आणि अनुशासनप्रिय, निर्व्यसनी आणि निष्ठेने संगीतसाधना करणारे कलाकार आणि शिक्षक घडविणे हेच जीवितकार्य मानलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वाशी येथील संकुलाचा विस्तार सोहळा विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या शुभहस्ते …

Read More »

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी घेतला पावसाळी नुकसानीचा आढावा

पनवेल ः वार्ताहर सातत्यपूर्ण मुसळधार पावसामुळे व त्याच वेळी भरती असल्यामुळे पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. या विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतला. शहरातील पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, वीट सेंटर, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर …

Read More »

पनवेलमध्ये मुसळधार पाऊस

आयुक्तांनी घेतली आढावा बैठक; नागरिकांना हलविले सुरक्षित ठिकाणी कळंबोली ः प्रतिनिधी पनवेल परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, बंदर रोड, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. कित्येकांच्या घरात पाणी गेल्याने आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खाडीलगतच्या रहिवाशांना संरक्षित ठिकाणी …

Read More »