सहा लाख 51 हजारांची फसवणूक उरण ः प्रतिनिधी एका गार्डची एजन्सी आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करणार्या किरण दीपक महाडिक या भामट्याला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला उरणच्या न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार एका खासदाराशी जवळीक असल्याचे सांगून …
Read More »जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन
उरण ः रामप्रहर वृत्त जेएनपीटीने टाऊनशिप येथे जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे शुक्रवारी (दि. 12) उद्घाटन झाले. हे ट्रॉमा केअर सेंटर 24 तास अविरतपणे कार्यरत राहणार असून स्थानिकांसाठी ही एक महत्वाची सुविधा असणार आहे, कारण यामुळे अपघात किंवा इतर गंभीर प्रसंगासाठी खास वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. उदघाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे …
Read More »सीकेटी विद्यालयात पालखी, वृक्षदिंडी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखी पूजन सोहळा, वृक्षदिंडी, वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा, असा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा मानवी नकाशा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार …
Read More »विठ्ठल नामाची शाळा भरली
नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीत नगरसेविका चारुशीला घरत पालखीच्या भोई झाल्या होत्या. नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीचे नगरसेविका राजश्री वावेकर यांनीही मनोभावे दर्शन घेतले. नवीन पनवेल ः येथील चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये वारकरी दिंडीत विद्यार्थिनी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या. नवीन पनवेल ः चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये …
Read More »उरण महाविद्यालयात वृक्षारोपण
उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम झाला. एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष, या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) स्वातंत्र्य सैनिक दत्ता रहाळकर खेळाचे मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे …
Read More »महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्याचे निलंबन
पनवेल ः प्रतिनिधी महापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, …
Read More »वाहून गेलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सापडले
पनवेल : तालुक्यातील गाढी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली. गुरुवारी (दि. 11) तिसर्या दिवशी आदित्य आंब्रे यांचा मृतदेह कामोठे जुई येथील खाडीत सापडला, तर महिलेचा रात्री उशीरा सापडला. 11 …
Read More »कै. चांगू काना ठाकूर यांचे उद्या 17वे पुण्यस्मरण ; सीकेटी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांचे 17वे पुण्यस्मरण आणि चांगू काना ठाकूर तथा सीकेटी कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. 13) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनी येथील महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »अतिधोकादायक इमारत, बांधकामे महापालिकेकडून जमिनदोस्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील अतिधोदायक इमारत व अनधिकृत बांधकामे महापालिकेने गुरुवारी (दि. 11) पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त केली. ही कारवाई आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त जमीर लेंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग अधिकार्यांनी पार पाडली. शनी मंदिराजवळील मूलचंद हरदेवप्रसाद गुप्ता यांचे दुकान अतिधोकायदायक असल्याने तेही जमिनदोस्त करण्यात …
Read More »श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाची वृक्षदिंडी
गव्हाण : रामप्रहर वृत्त – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा जयघोष करीत विठूनामासोबत वृक्षसंवर्धनाचा गजर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये करण्यात आला. येथील विद्यार्थी व रयत सेवकांनी काढलेल्या वृक्षदिंडीने कोपर व गव्हाण पंचक्रोशी दुमदुमली. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार्या व पारंपरिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper