महापालिकेतील बैठकीत सकारात्मक चर्चा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील महावितरण विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) महापालिकेच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शहरातील विजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन या वेळी ‘महावितरण’च्या अधिकार्यांनी दिले. या बैठकीला महापौर डॉ. …
Read More »पनवेलमध्ये आता जिल्हा व सत्र न्यायालय; शासनाचे शिक्कामोर्तब
आमदार प्रशांत ठाकूर आणि वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे येत्या 27 जुलैपासून जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर या तालुक्यांतील पक्षकार आणि वकिलांचा अलिबागला जाण्याचा दूरचा फेरा, तसेच वेळ व पैसा वाचणार आहे. याबद्दल पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष …
Read More »नीलेश पाटील यांचा वाढदिवस साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ सामाजिक मंडळाच्या वतीने वह्यावाटप, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नीलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे महंत आबानंदगिरी ट्रस्टने मानले आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र पांचाळ यांनी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तेथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजेंद्र पांचाळ यांनी …
Read More »‘सीकेटी’त आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन ; तैवान युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर …
Read More »अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका
पनवेल ः बातमीदार अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती …
Read More »कुख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर जेरबंद ; मुंबई पोलिसांची यशस्वी कारवाई
उरण ः प्रतिनिधी मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा …
Read More »महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा साजरी
खारघर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. डी. जी. डोंगरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कळंबोली येथील एसएमडीएल महाविद्यालयातदेखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. एनएसएस विभाग व डीसीबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण
उरण : बातमीदार टायगर ग्रुपच्या वतीने मोठी जुई येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळी आंबा, काजू, कोकम अशी कलमे लावण्यात आली. या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, मावळ अध्यक्ष अनिकेत घुळे, मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड अध्यक्ष निलेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय …
Read More »वर्षासहल व काव्यवर्षा कार्यक्रम उत्साहात
चिरनेर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोल्ही कोपर (पनवेल) येथील डोंगरावर असलेल्या श्री शंकर व श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य विकास मंडळाने वर्षासहल व काव्यवर्षा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सलग तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महाप्रसादही असतो. या कार्यक्रमासाठी आर. सी. घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper