Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट

रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. …

Read More »

पनवेल बार असोसिएशनकडून चव्हाण यांना श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. ई. ए. चव्हाण यांचे नुकतेच 73व्या वर्षी निधन झाले. पनवेल बार असोसिएशनच्या वतीने येथील बार रुममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश रावसाहेब, भााकरे, पाठक, मुजावर, स्वामी तसेच बार असोसिएशानचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अन्य वकील उपस्थित होते. यावेळी ई. ए. …

Read More »

चिमुकलीवर बलात्कारप्रकरणी नराधमास 10 वर्षांचा कारावास

उरण ः वार्ताहर – उरणमधील बौद्धवाडी येथील चारवर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपी रोहन राजेंद्र कासारे (20) यास दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी राजेंद्र कासारे यांनी याच ठिकाणी रहाणार्‍या चारवर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; दोन ट्रक दुभाजकावर धडकले, चालक गंभीर

पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी (दि. 27) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा ट्रक उजव्या …

Read More »

मुसळधार पावसामुळे पनवेलकर सुखावले

पनवेल ः वार्ताहर – गेल्या 15 दिवसापासून पावसाची पनवेलकर आतुरतेने वाटत पाहत होते. तो पाऊस गुरुवारी (दि. 27) सायंकाळपासून सुरूवात झाला व त्याचा जोर वाढतच गेल्याने या पावसामुळे पनवेलकर चांगलेच सुखावले आहेत. असाच पाऊस अजूनही काही तास पडत राहू दे हीच इच्छा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वातावरण …

Read More »

अंमली पदार्थविरोधात पोलिसांची मोहीम

समिती स्थापन करण्याचे शिक्षण संस्थांना आवाहन पनवेल ः बातमीदार – आपल्या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला अंमली पदार्थ  सेवनापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येकाने अंमली पदार्थविरोधी मोहीम ही स्वत:च्या घरापासून सुरू करावी, पालकांनी आपल्या मुलांना याबाबत माहिती द्यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी विद्यार्थी व शिक्षकांची एकत्रित समिती स्थापन करावी, असे आवाहन नवी …

Read More »

पनवेलमध्ये लवकरच ‘मेट्रो’

शहर ट्रेनने विमानतळाला जोडण्याचे विकास आराखड्यात नियोजन टपाल नाका ते रेल्वेस्थानकदरम्यानही धावणार पनवेल ः बातमीदार – पनवेल महापालिकने 2045 सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखड्यात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियोजनानुसार शहरातील …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्या पनवेलमध्ये जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या …

Read More »

वनखात्याच्या परवानगीअभावी रखडलेले रस्ते मार्गी लागावेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांची सभागृहात मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त वनखात्याच्या परवानगीअभावी ज्या रस्त्यांची कामे अडली आहेत, ती कामे तातडीने होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलत होते.       कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची परवानगी न घेता कंत्राटदारांनी मोरेवाडी ते गावंडवाडी रस्त्याचे …

Read More »

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमरदीप बारटक्के विजेता

पनवेल : बातमीदार येथील अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे वीरुपाक्ष मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राज्यातील 200 स्पर्धकांचा व पालकांचा सहभाग लाभला. स्पर्धेत फीडे मानांकित खेळाडू, तसेच 9, 12, 15 वयोगटाखालील, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व खुल्या वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सात फेर्‍यांत …

Read More »