Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बॉम्बसदृश वस्तू; कळंबोलीत खळबळ

पनवेल : प्रतिनिधी सिद्घिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील एका शाळेजवळ बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. कळंबोलीतील एका शाळेसमोरील प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांची तारांबळ उडाली असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल …

Read More »

आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या परिषदेत रायगडचे विद्यार्थी करणार प्रतिनिधित्व ; रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक मदत

पनवेल ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 70व्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सोमवारी (दि. 17) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये विविध विकासकामांचा थाटात शुभारंभ

खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन या परिसरामधील विविध कामांचा शुभारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. खारघरमधील वास्तूविहार आणि सेलिब्रेशन येथील सर्व सोसायटींना …

Read More »

कुंडलिका नदीत बुडालेला तिसरा पर्यटक सापडला

रोहे ः प्रतिनिधी कोलाड विभागातील बल्हे येथे मुंबई येथून आलेले तीन पर्यटक कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यातील दोघांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. सोमवारी सकाळी तिसरा पर्यटक महेश जेजुरकर याचा मृतदेह पोलीस व रेस्क्यू टीमच्या हाती लागला. मुंबईतील ट्रॉम्बे येथील 28 जण शनिवारी कोलाड (ता. रोहे) विभागातील बल्हे …

Read More »

अडथळा निर्माण करणार्या बांधकाम व्यावसायिकांना उपमहापौरांची तंबी

पनवेल ः वार्ताहर नव्याने इमारत उभारत असताना इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यातून वाहणार्‍या गटारावरच टाकणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना आज (दि. 17) पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तंबी दिली आहे. तातडीने सदर साहित्य हटविण्यास तसेच तुटलेली गटारे व स्लॅब बांधून देण्यासही संबंधितांना सांगण्यात आले आहे. शहरातील चिंतामणी मंगल …

Read More »

विमानतळ प्रकल्प गावांतील शाळा स्थलांतरित!

पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतरित होणार्‍या दहापैकी दोन गावांनी अजूनही आपली राहती घरे सोडली नाहीत, मात्र या दोन्ही गावांतील शाळांचा प्रश्न मिटला असल्याने सोमवार (दि. 17) पासून जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा आता उलवे नोडमध्ये सिडकोने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये सुरू होत आहेत. यानंतर गावे रिकामी करण्याचा ओघही वाढण्याची …

Read More »

भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विविध गावांना भेट

पनवेल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सोमवारी जांभिवली, चावणे आणि कराडे खुर्द या ठिकाणी भेट देत उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किरण माळी, रवींद्र चिपळे, विजय मुरकुटे, प्रभाकर माळी, राजेश सोनावळे, बंडू मोडक, …

Read More »

पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे अभिनंदन

पनवेल : रायगड जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी विश्वजित पाटील, विश्वनाथ कोळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

कराटेपटू गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण : प्रतिनिधी मुंबई येथे प्रियदर्शनी फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या युवक व युवतींना  भारत अस्मिता गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे येथील गोसिन रियु कराटे असोशिएशनचे गोपाळ दिनकर म्हात्रे, अमिता अरुण घरत, आमिषा अरुण घरत (केळवणे, ता. पनवेल) यांनी …

Read More »

पनवेल महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीनं राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले. ही मोहीम पोलिओविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि अपेक्षित लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी राबविण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेलमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 …

Read More »