Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सीकेटी विद्यालयाचे गायन स्पर्धेत सुयश

पनवेल : प्रतिनिधी  : पनवेल-उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पोवाडा गायन स्पर्धेमध्ये नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने द्वितीय पारितोषिक मिळविले. रोख रकम रु. 2000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे …

Read More »

सेवा सहयोगच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी : येथील सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व गवाणे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यामंदिर गवाणे, जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा गवाणे व इतर शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल किटचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येेत …

Read More »

अतिक्रमणाविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील शिवसेना महिला आघाडी यांनी नवीन पनवेल सेक्टर 5 ए मधील पुलाच्याखाली आणि रेल्वेरुळाच्या जवळील पादचारी रस्त्यावर अनधिकृत भाजीवाले, हातगाडीवाले असे जवळपास 15-20 वेगवेगळे व्यावसायिक तेथे व्यवसाय करीत असल्याने नागरिकांना चालण्यास त्रास होत असतो, ह्यासंबंधीत कारवाई व्हावी ह्यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे …

Read More »

वीज अधिकार्यांसमोर ग्रामस्थांचा तक्रारींचा पाढा

उरण ः प्रतिनिधी : उरण तालुक्यातील विजेचा लपंडाव व समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांसमोर वाचला. यानंतर अधिकार्‍यांनी नेहमीच्या पद्धतीने लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.  या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. उरण परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा मार्ग निघत नव्हता. दोन दिवसांपूर्वी …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देणे हीच दि.बां.ना खरी आदरांजली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची स्मृतिदिनी भावना पनवेल ः प्रतिनिधी आपले नेते दि. बा. पाटील साहेब योध्दा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी सक्रियतेने काम करून दि. बां.चेे स्वप्न साकार करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. 24) येथे केले. शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे …

Read More »

जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर ‘कमळ’ फुलले

रसायनी ः बातमीदार कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले असून थेट सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे या निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार विजय मुरकुटे यांना निसटता पराभव पत्करावा लागला.  कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवार (दि. 23) होऊन सोमवारी पनवेल तहसिल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी …

Read More »

आवरे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या निरा सहदेव पाटील यांनी थेट सरपंचपदी बाजी मारली. शेकापच्या उमेदवार अमृता धनेश गावंड यांचा 850 मताधिक्याने पराभव करीत 2038 मते मिळवून आवरे ग्रामपंचायतींमध्ये त्या दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत. आवरे ग्रामपंचायतीमधील गेली अनेक वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून शेकाप …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूल व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय येथे योग शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, ओवेपेठ येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अंबिका योग कुटिरच्या सीबीडी केंद्रातर्फे एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी वर्गाला मनःशांती व शरीर स्वास्थ्याचे प्रशिक्षण देण्यात …

Read More »

वावंढळ तलाव गाळमुक्त कधी होणार?

रसायनी : वार्ताहर वावंढळ येथे शिवकालीन तलाव असून त्यात विहीर घेऊन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे. ही योजना करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तलावाची खोली वाढविण्यासाठी व बांधबंदिस्त करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याकडे पुनर्वसन विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने तलाव मार्च महिन्यातच कोरडा पडतो, गेली पाच …

Read More »

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीला मारहाण

पनवेल : वार्ताहर कौटुंबिक वादातून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या आपल्या पत्नीस पतीने लाथाबुक्क्याने, तसेच दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. पनवेल तालुक्यातील भेरले, कातकरवाडी मोठे भिंगार येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार कल्पना ऊर्फ पिंकी आदेश वाघमारे (24) यांचे लग्न पती आदेश तात्या …

Read More »