Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वावंढळ-चौक परिसरात जनावरांची चोरी; शेतकरी चिंतातूर

रसायनी : प्रतिनिधी : भिलवले या भागात गेल्या दोन महिन्यांत, शेतकरी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 20 जनावरे चोरीला गेल्याने येथील शेतकरी चिंतातूर झाला असून शेतीचा हंगाम जवळ आल्याने नांगरणीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वावंढळ येथील शेतकरी प्रकाश सखारामराव कदम यांचा एक बैल एप्रिलमध्ये चोरीला गेला, काही दिवसांनी दुसराही बैल चोरीला …

Read More »

‘कोपरा पुलावरील वाहतूक कोंडीवर पर्याय काढा’

खारघर : प्रतिनिधी : धोकादायक असल्याने सिडकोने कोपरा पूल वाहतुकीस बंद केला आहे, मात्र या निर्णयानंतर या ठिकाणी असलेल्या दुसर्‍या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने एका बाजूने वाहन गेल्याशिवाय दुसर्‍या वाहनांना मार्गक्रमण करता येत नसल्याने सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात सेनेच्या विभागप्रमुख मनेश …

Read More »

आपल्या आशीर्वादामुळेच यशस्वी झालो

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी मानले मतदारांचे आभार पनवेल : वार्ताहर : 26 मे 2019 रोजी म्हणजेच 5 दिवसांपूर्वी मला आपल्या प्रभागाचा ‘नगरसेवक’ म्हणून निवडून येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. आपण भरभरून दिलेले प्रेम व आशीर्वाद यामुळेच मी संघर्षपूर्ण निवडणुकीत यश संपादित करू शकलो व नगरसेवक होऊ शकलो याची मला संपूर्ण …

Read More »

पंचायत समिती शेष फंड अंतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त : गव्हाण पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या पंचायत समिती शेष फंडांतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले. न्हावा, गव्हाण, तरघर, उलवा या ग्रामपंचायत हद्दीतील अपंगांना गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये धनादेशाचे वाटप पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता …

Read More »

उरणमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात निर्विवाद बहुमत मिळाल्याने भाजपमध्ये विविध पक्षकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच धर्तीवर उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांनी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपत प्रवेश केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष रवी …

Read More »

पनवेलमधील झोपडपट्टीतील अनधिकृत दुकाने जमीनदोस्त ; वाहतूक कोंडी संपणार; रस्ते घेणार मोकळा श्वास

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्‍या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होईल. पनवेल शहरातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. …

Read More »

पनवेल महापालिकेला मिळणार जीएसटीचे 466 कोटींचे अनुदान

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले 466 कोटींचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या वेळी अनुदानाची मागणी केल्यावर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याने आता लवकरच हे अनुदान महापालिकेला मिळेल, असा …

Read More »

पाच तरुणांची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर परदेशात मर्चन्ट नेव्हीमध्ये सेलर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पाच बेरोजगार तरुणांकडून आठ लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंशुलकुमार विजयपाल सिंग असे या भामट्याने नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव विंकल …

Read More »

मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवासाचे भाडे वाढले

उरण : वार्ताहर मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) या जलप्रवासाच्या (लाँच सेवा) भाड्यात सोमवार (दि. 26) मेपासून 18 रुपयांची भाववाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच असुविधा आणि प्रवाशांची असुरक्षितता यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास होत असताना मेरीटाईमच्या या प्रवासभाडे वाढीमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी …

Read More »

रिलायन्सच्या व्यवस्थापकाचे अपहरण व सुटका

पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू पनवेल : बातमीदार शेतातून जाणार्‍या गॅस पाइपलाइनचा मोबदला मिळविण्यासाठी तिघा व्यक्तींनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीचे व्यवस्थापक हितेन राय याला गाडीमधून डांबून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी खारघरमध्ये घडला, मात्र या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईबाबत बोलणी केल्यानंतर त्याला ऐरोलीत सोडून पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तिघांवर …

Read More »