पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेचे वाहनतळ मनपाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मोकळे केले आहे. रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एकमेव वाहनतळात हार, फुले, गजरे विक्रेत्यांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले होते. पनवेल शहरात पार्किंगची अवस्था अत्यंत कठीण आहे. छोट्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तत्कालीन नगर परिषदेत …
Read More »आदिवासी मुलांसोबत वाढदिवस साजरा
उरण : बातमीदार साप्ताहिक प्रांजलचे संपादक, तसेच इतर वृत्तपत्रांत काम करणारे पत्रकार घन:श्याम (राजाभाई) कडू यांनी आपला 50वा रायगड जिल्हा परिषदेच्या रानसई येथील शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम, बिर्याणी आणि इतर खाऊ देण्यात आला. त्याचबरोबर शाळेला लेझीम संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने शालांत परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच मुंबईच्या कन्नमवारग्राम विक्रोळी येथील कामगार कल्याण भवनात केला. या समारंभाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल शाखेचे विशेष सहायक अरविंद मोरे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, ठाणे विभाग …
Read More »रायगड फायटर्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि संजय भोपी प्रतिष्ठान सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 24) नुकतीच खांदा कॉलनीत रंगली. या स्पर्धेत रायगड फायटर्स संघाने विजेतेपद पटकाविले; तर तोरणा रेंजर्स संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्षे …
Read More »शारजाह-जेएनपीटी मालवाहतूक मार्ग
उरण : प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शेजारील देशांमध्ये व्यवसायातील नवीन पुढाकाराने प्रगतीचा वेग वृद्धिंगत करीत आहे. मालवाहतुकीसाठी चालू असलेल्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) व भारत समुद्री मार्गावर आता सरळ शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला-जेएनपीटी असा नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. या …
Read More »विवाहितेची आत्महत्या
जेएनपीटी ः वार्ताहर उरण चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील श्रीयोगनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणार्या स्नेहल म्हात्रे (28) या विवाहित महिलेने छताच्या पंख्याला स्वत:ची ओढणी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा गावात राहणार्या स्नेहलचे लग्न …
Read More »रिपाइं तालुका अध्यक्षपदी संजय गायकवाड
उरण ः प्रतिनिधी उरण येथील पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम तसेच कामगार व सर्व थरातील श्रमिकवर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा तथा कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते संजय गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून आढावा
पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ठाणे परिक्षेत्रासह नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे, नवी मुंबईसह कोकण परिक्षेत्रात पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या त्याचा आढावा घेण्यात आला, तसेच निवडणुकीदरम्यान …
Read More »उरणमध्ये विद्युत डीपीला आग
उरण : बातमीदार उरण शहरातील आनंदनगर कॉर्नर येथील लिबर्टी पार्क (सोसायटी)जवळील महावितरण कंपनीच्या एका डीपीला मंगळवारी (दि. 26) सकाळी अचानक आग लागली. डीपीवर वाढलेली झाडेझुडपे व कचर्यामुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. डीपीला आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या जागरूक नागरिकांनी महावितरण, अग्निशमन दल, उरण नगर परिषदेशी संपर्क साधला. त्यानुसार सिडको व …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण कोर्स
पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोकडून विमानतळ संबंधित प्रशिक्षण कोर्स सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मुला-मुलींनी सिडकोच्या तारा प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. सिडकोच्या तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने रोजगारभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रमांतर्गत सध्या एअर लाइन्स रिझर्वेशन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper