आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील बारवई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. बारवई येथील झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल …
Read More »ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी पनवेलमध्ये व्याख्यान
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी (दि. 30) सायंकाळी 5 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय …
Read More »भारतीय संघात निवड झालेल्या रायगडातील तायक्वांदोपटूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाखांची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय तायक्वांदो संघात निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 29) जाहीर केले. या खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. नाशिक …
Read More »झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
अवैधरित्या काम करणार्या परजिल्ह्यातील ठेकेदारांची मक्तेदारी येणार संपुष्टात पनवेल ः रामप्रहर वृत्त शासनाची सर्रास होणारी लूट लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेऊन झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्य सरकार गौण खनिजाबाबत पुढच्या पंधरा दिवसात स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही त्यांनी …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तातडीने निधी देणार
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती – आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तसेच प्रणाली बळकट करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात …
Read More »इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …
Read More »न्हावे गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
स्वखर्चातून केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खर्चातून 40 लाख रुपयांचा निधी वापरून न्हावे गावात जलकुंभ, महिला मंडळाचे कार्यालय आणि व्यायाम शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी …
Read More »जलजीवन मिशनसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी वेधले विधिमंडळात लक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळण्यासाठी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. राज्यात विशेषत: रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार्या जलजीवन मिशन …
Read More »रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी
पनवेल महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय कामे सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या चारही प्रभागामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी चारही प्रभागातील रस्त्याचा आढावा घेऊन तातडीने यावरती उपाययोजना करण्याबाबत संबधित विभागास सूचना दिल्या आहेत. …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रातील 1000 मुलींना मिळणार सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ
आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023मध्ये जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper