Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा आहे, तर सरकारच्या माध्यमातून सिडको नैना प्राधिकरणाने पुढे येऊन स्पष्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. आमदार प्रशांत …

Read More »

पनवेल परिसरात तीन वेगवगेळ्या अपघातात एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या …

Read More »

रायगडात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (दि. 21) पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे सकाळी कामावर जाणारे कामगार आणि शाळेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. वरुणराजाने सकाळीच हजेरी लावली. या पावसाचा प्रामुख्याने जोर उत्तर रायगडात दिसून आला. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग, रोहा अशा अनेक तालुक्यांमध्ये …

Read More »

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात 14 ते 16 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे …

Read More »

भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर होणार कडक कारवाई

तक्रारीच्या अनुषंगाने कारखान्यांचे मोजमाप करून योग्य कर आकारणी करणार पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या दहा वर्षांपासून कर थकविल्यामुळे भाताण येथील अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. 20) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. पनवेल तालुक्यातील जांभिवली, चावणे, कराडे खुर्द, भाताण या ग्रामपंचायतींच्या थकीत करासंदर्भात …

Read More »

पनवेलचा जयदीप मोरे गेट परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील जयदीप सुधाकर मोरे (21) या विद्यार्थ्यांने ग्रॅजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (गेट) परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जयदीपने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. गेट ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी उमेदवारांच्या अभियांत्रिकी आणि विज्ञानातील ज्ञान आणि …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार शोरूमचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी अनुभव, जिद्द आणि मेहनतीने पनवेलकरांचा विश्वास मिळवल्याने आज पनवेलमधील मोजक्या मोठ्या उद्योजकांत शेळके परिवाराचे नाव आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या मे. द्वारकादास शामकुमार एक्सक्लुसिव्ह शोरूमच्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) झाले. …

Read More »

गुळसुंदे विभागात विकासकामांचा झंझावात

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती विभागातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले. यामध्ये दहा लाख रुपयांच्या निधीतून लाडीवली येथील स्मशानभुमी …

Read More »

भाजप नेते एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

पनवेल : रामप्रहर भाजप रा. जि. ओबीसी संघटन अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 19) विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. एकनाथ देशेकर यांनी वाढदिवसानिमित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भानघर येथील करूणेश्वर …

Read More »

मनाला स्थिर ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक -आमदार प्रशांत ठाकूर

तळोजामध्ये रंगली भव्य भजन स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त भटकत राहणार्‍या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा हि आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी …

Read More »