Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मोहोपाडा शाळेतील वर्गमित्रांचा 24 वर्षांनंतर स्नेहमेळावा

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये  सन 1998 साली इयत्ता दहावीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात झाला. दहावीच्या वर्गांतील हे विद्यार्थी 24 वर्षांनंतर (दोन तपे) एकमेकांना भेटले. या कार्यक्रमास 1998 साली अध्यापन करणारे चार शिक्षकही स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. या वेळी शिक्षकांच्या …

Read More »

गव्हाण विद्यालयाचा मुलांचाही खो-खो संघ उपविजेता

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे. 14 वर्षे वयोगटातील अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मुलांच्या संघाने सामना जिंकून विजेतेपद …

Read More »

डायबिटीज जनजागृती मॅरेथॉनला पनवेलमध्ये प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः वार्ताहर समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॅरेथॉन रविवारी (दि. 13) नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘गेल’विरोधात आंदोलन 

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अलिबागमध्ये इशारा रेवदंडा ः प्रतिनिधी गेल इंडिया कंपनीकडे उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहेत. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. ते रविवारी (दि. …

Read More »

आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यात कारवाई; दोन आरोपी जेरबंद पनवेल ः वार्ताहर ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी दोन हजार रुपये चलनी दराच्या तब्बल आठ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा-5कडून ही कारवाई करण्यात आली. ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख …

Read More »

महिला लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवित आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणीने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा हिचा शनिवारी (दि. 12) सत्कार …

Read More »

करंजाडेतील शेकापला गळती सुरूच; कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडीतील शेकाप कार्यकर्ते असलेल्या आदिवासी बंधू-भगिनींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 12) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील टेंभोडे येथे ओपन जिम

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असून नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्या अंतर्गत टेंभोडे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे …

Read More »

खेरणे ग्रामपंचायतीत भाजपचे पर्व

सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी स्वीकारला पदभार पनवेल ः रामप्रहर वृत्त खेरणे ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम होते. ते मोडीत काढत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विराजमान झाले आहेत. सरपंच शैलेश माळी आणि उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »

हिंदूविरोधी वक्तव्य करणार्‍या काँग्रेस नेत्याचा पनवेलमध्ये निषेध

पनवेल : वृत्तसंस्था कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोली यांनी हिंदूविरोधी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या कृत्याचा सर्वत्र विरोध होत असून पनवेल भारतीय जनता पक्षाने जारकिहोली यांच्याविरोधात शुक्रवारी (दि. 11) घोषणाबाजी करीत निषेध केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस …

Read More »