Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उलवे नोडमधील सोनाराला सव्वा लाखाचा गंडा

पनवेल : वार्ताहर सोनाराला बनावट चेन विकून एक लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उलवे नोड मध्ये घडली आहे. उलवे सेक्टर 20 येथील सागर ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. कामगार अरुणकुमार जोशी हा ज्वेलर्समध्ये असताना एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आली होती. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याकडील सोन्याची …

Read More »

सभापती प्रमिला पाटील यांच्याकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने सिडको वसाहतींमधील मान्सूनपूर्व कामे हाती असून ही कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभुमीवर कळंबोली शहरामध्ये सुरू असललेल्या नालसफाई तसेच गटारांच्या कामांची पाहणी प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) केली तसेच अधिकरार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महापलिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमधील …

Read More »

बेकायदेशीर होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नावडे-तळोजा गाव ते पेंधर फाट्यादरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असताना त्याठिकाणी अवाढव्य दोन फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. नावडे-तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळ  महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून …

Read More »

सिडको घेराव आंदोलन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या …

Read More »

उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सांगता

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने मल्लविद्या कुस्ती संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमासाठी रेडक्लीपच्या प्राचार्य सौ. अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार …

Read More »

पनवेलमध्ये सायक्लोथॉनला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयकर विभाग पनवेल या ठिकाणी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते. पनवेल परिक्षेत्र अतिरिक्त आयकर आयुक्त अभिषेक सिंग यांनी कार्यक्रमाची …

Read More »

मोरा बंदरातील गाळाची सफाई

भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास होणार सुरळीत उरण : रामप्रहर वृत्त मोरा बंदरातील चार कोटी रुपये खर्च करून एक लाख 18 हजार 927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. यामुळे भाऊचा धक्कापर्यंतचा जलप्रवास सुरळीत होणार आहे. समुद्राच्या ओहोटीमुळे बंद ठेवण्यात येणारी समस्या दूर झाली असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात …

Read More »

कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज  कृष्णाजी  भुजबळ यांच्या नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 मधील जनसंपर्क कार्यालयात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाऊ भुजबळ, महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश …

Read More »

नाका कामगारवर्गात चिंतेचे वातावरण

दररोजचे काम मिळत नसल्याने मंदीचे सावट पनवेल : वार्ताहर पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यांसह परराज्यातून अनेक कुटुंबे शहरांकडे येतात. दररोज सकाळी शहरातील नाक्यांवर उभे राहून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सकाळी नाक्यांवर एक प्रकारे मजुरांचा बाजाराच भरलेला असतो, परंतु नाक्यावर सर्वांना दररोज काम मिळत नसल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण …

Read More »

तळोजा एमआयडीसीत अमलीसाठा नष्ट

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर  भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट …

Read More »