Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाण विद्यालयात चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण विद्यालयाने एचएससी व एसएससी अर्थात दहावी आणि बारावीच्या बोर्डा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा राखली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत …

Read More »

उरणमध्ये विकासकामांचा शुभारंभ

दिघोडे येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावात विविध विकासकामांचा शुभारंभ झाला असून या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे गावात जाणार्‍या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. नागरिकांना त्याचा त्रास होत होता, ही समस्या लक्षात घेत …

Read More »

12व्या वर्षीच मॅट्रीक पास! खारघरमधील विद्यार्थ्याची कमाल; 62 टक्के गुण

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील एका 12 वर्षीय मुलाने चक्क दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. सहजप्रीत सिंह असे या मुलाचे नाव असून तो दहावीत 62 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. दहावीत यश मिळवणारा सहजप्रीत हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा मुलगा ठरला आहे. सहजप्रीत हा खारघरच्या केपीसी शाळेत …

Read More »

सुरक्षारक्षक तैनात करून पांडवकडा धबधबा पर्यटनासाठी खुला करावा

खारघर-तळोजा भाजप मंडलची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात यंदाही पर्यटकांना शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. येथे होणार्‍या दुर्घटनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, पण योग्य प्रकारे सुरक्षारक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता हा परिसर पर्यटनासाठी खुला करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलातील …

Read More »

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून विविध कामांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील महापालिका हद्दीत मान्सून सक्रिय होण्यापूर्वी वेगाने कामे सुरू आहेत. या  अनुषंगाने खारघर येथील मुर्बी आणि पेठगाव या भागात नालेसफाईच्या तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला तसेच या कामासंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. …

Read More »

भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचा लूट हा कॉमन प्रोग्राम

माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांचा घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारला राज्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. फक्त स्वतःचे भले करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले असून लूट, लूट आणि लूट हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन प्रोग्राम आहे, अशी घणाघाती टीका …

Read More »

युईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.46 टक्के

उरण : वार्ताहर या वर्षी जाहीर झालेल्या 10वी च्या निकालात यु. ई .एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.46 टक्के निकाल लागला असून कनिष्का गिरीष पाटील हिने 94.80 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, यश जितेंद्र म्हात्रे, गायत्री रविंद्र घोलप आणि शिवांगी नानासाहेब डांगे या तिघांनीही 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. संस्कृती नरेंद्र …

Read More »

24 जूनला सिडको घेराव आंदोलन होणारच!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती सज्ज पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच …

Read More »

अपहृत बालकाची 12 तासांत सुटका

पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी; बालकाला नातेवाईकांकडे केले सुपूर्द पनवेल : संजय कदम दोन वर्षाच्या अल्पवयीन अपहृत बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासाच्या आत सुटका केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे. अधिक वृत्त असे, तळोजा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस …

Read More »

पनवेल शहरात सात ठिकाणी हायमास्ट

नगरसेवक अनिल भगत यांच्या निधीतून सुविधा पनवेल: रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक नागरीकांना विविध सुविधा देण्यात करीता सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याअंतर्गत नगरसेवक अनिल भगत यांच्या नगरसेवक निधीमधून शहरातील सात ठिकाणी हायमास्ट उभारण्यात आले आहेत. या हायमास्टचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. पनवेल शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट, कोळीवाडा, स्मशानभुमी, …

Read More »