Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल-मुंब्रा महामार्गालगतच्या जलवाहिन्या जीर्ण

महाराष्ट्र प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरामध्ये सध्या आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे रहिवासी शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 23 ते 29 एप्रिल दरम्यान नेरे येथील शांतीवन येथे 7 दिवसीय विशेष रहिवासी शिबिर उत्साहात झाले. 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता शिबिराच्या उद्घाटनला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे …

Read More »

मिनेश गाडगीळ राज्य शासनाच्या कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असे शेतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांना राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीकरिता कृषिभूषण 2019 पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, …

Read More »

नगरसेवक अजय बहिरा, युवानेते प्रतीक बहिरा यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहराजवळील तक्का परिसरात स्थानिक नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा युवामंचाचे प्रतीक बहिरा यांनी आज मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी मुस्लीम बांधवांसह तेथे आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व बांधवांना शुभेच्छा देत …

Read More »

भाजप नेते सय्यद अकबर यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका भागात मोठ्या उत्साहात व शांततेत रमजान ईद साजरी झाली. नवीन पनवेल दारूल अमन मस्जिद जवळ भाजप नेते सय्यद अकबर यांनी गुलाबपुष्प व रुमाल वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस …

Read More »

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नावड्यात कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा-संस्कृती महाराष्ट्राची हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 1) रंगला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, …

Read More »

शांतिनिकेतन स्कूलच्या प्रवेशद्वारावरील  गटारावर बसवली झाकणे

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील गटारावरील झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात पाय  घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी  दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचर तक्रार होताच सिडकोने त्या खड्ड्यावर तातडीने झाकणे बसवल्याने पालकांनी नि:श्वास सोडला. नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर फुटपाथखाली …

Read More »

उरणमध्ये बीएमएसचे त्रैवार्षिक अधिवेशन

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन उरण ः वार्ताहर भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे (बीएमएस) 10वे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 30 एप्रिल ते 1 मेदरम्यान जेएनपीटीच्या कामगार संघटना बहुउद्देशीय सभागृहात भरविण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

दुसर्‍या दिवशीही शासनाकडून दखल नाही उरण ः बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या कर्मचार्‍यांनी रविवारी (दि. 1)पासून कामबंद आंदोलन सुरू केले असून सोमवारी (दि. 2) दुसर्‍या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील नगर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीने चौक गावातील अंतर्गत रस्त्याचे काम मार्गी

चौक ः रामप्रहर वृत्त चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येथील ग्रामस्थांनी थांबविले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आमदार महेश बालदी यांनी येथे सोमवारी (दि. 2) भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य …

Read More »