पनवेल महापालिका आणि ‘माविम’ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल ः प्रतिनिधी कौशल्य विकासातून महिला एक यशस्वी उद्योजिका म्हणून झेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या बचत गटाच्या कार्यक्रमात उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. पनवेल महापालिका डेएनयुएलएम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), युनाटेड वे, सक्षम फाउंडेशन, नवी मुंबई डेएनयुएलएम विभाग यांच्या …
Read More »वाहतूक पोलिसांनी दिला अपंग व्यक्तीच्या सायकलला आधार
पनवेल : रामप्रहर वृत्त पोलीस म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू देवदूतदेखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना आला. मंगळवारी (दि. 22) संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंटजवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना …
Read More »नवीन पनवेलमध्ये निकृष्ट धान्याचे वाटप
नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक; कारवाईची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील एका रेशनिंगच्या दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबत महापालिका प्रभाग ड समिती सभापती व स्थानिक नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक झाल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कारवाई झाली नाही, तर …
Read More »तळोजा एमआयडीसीतील गतिरोधकांची दुरवस्था
पनवेल : वार्ताहर गतिरोधकांच्या दूरवस्थेमुळे वाहनांची नासधूस होत असल्याचे प्रकार तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील प्रवासादरम्यान अनुभवायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावरील गतिरोधक वेळीच दुरूस्त न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांकडून वर्तविली जात आहे. याबाबत तळोजा वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा कार्यालयाला चार पत्र पाठविले आहे, मात्र वाहतूक …
Read More »‘डीएव्ही’च्या वाढीव फीविरोधात पालकांचे आंदोलन; तक्रारींसंदर्भात आज सुनावणी
नवी मुंबई : प्रतिनिधी सिवूडस येथील डीएव्ही पब्लिक स्कूलने शाळेच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त फी घेऊ नये यासाठी पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. 22) सकाळी सर्व पालक शाळेसमोर एकवटून डीएव्ही शाळा अतिरिक्त फी का वसूल करते? याचा जाब विचारण्यासाठी जमले असता शाळेच्या मुख्याध्यापका कांचन मनोजा यांनी पालकांना वेळ देऊनदेखील …
Read More »विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चला
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड …
Read More »पनवेलमध्ये धम्म परिषद उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 21) धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत …
Read More »पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडको अधिकार्यांना शिवाजीनगर ग्रामस्थांनी हाकलले
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी (दि. 22) शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकार्यांना संतप्त ग्रामस्थांनी हाकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास या वेळी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवाजीनगर येथील पिण्याचे पाण्याचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता …
Read More »पिल्ले कॉलेजमध्ये युफेरीया जल्लोष; अभिनेत्री किशोरी शहाणे यांची उपस्थिती
रसायनी : प्रतिनिधी येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या युफेरीया जल्लोषमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार किशोरी शहाणे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. या वेळी ढोल पथकाचा कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. कॉलेजने कला अॅकॅडमी सुरू करावी …
Read More »संतप्त न्हावा ग्रामस्थांची सिडको भवनवर धडक; अधिकार्यांना घेराव
उरण : प्रतिनिधी दररोज पाच तास पाणीपुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 21) सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला. न्हावा ग्रामपंचायतींची न्हावाखाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper