पनवेल ः रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर …
Read More »एक लाखासाठी आईने पोटच्या मुलाला विकले; पनवेल पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड
पनवेल ः संजय कदम ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलाला विकल्यानंतर स्वत: आईनेच पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर …
Read More »‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा
पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः …
Read More »खारघरमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग 6चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 18 मधील त्रिकोना पार्क येथे रविवारी (दि. 6) सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले गेले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ आयोजित केले जात आहेत. विद्या भारतीची उपकंपनी संस्था क्रीडा भारती, विद्यार्थी परिषद, राष्ट्र …
Read More »ई-श्रम आणि युनिव्हर्सल कार्ड शिबिर
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील प्रभाग क्र.34 भाजप अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड आणि रेल्वे प्रवासाकरिता युनिव्हर्सल कार्ड काढून देण्याचे शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर-8 येथील भाजप कार्यालयात झालेल्या या शिबिराचा लाभ सुमारे 400 गरजूंनी घेतला. या वेळी माजी महापौर …
Read More »भातशेतीचे क्षेत्र होतेय कमी
उरणमध्ये 11 हजारांपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड उरण : रामप्रहर वृत्त पन्नास वर्षांपूर्वी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर येथे अनेक उद्योग तसेच नागरिकरण वाढत गेल्याने हळूहळू भातशेतीचे क्षेत्र कमी होत गेले. आता तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त दोन हजार सेक्टरवर भात …
Read More »शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; खारघरमधील प्रकार, महिलेने केली तक्रार
पनवेल ः प्रतिनिधी शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात खारघरमधील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली असून घरकाम करणार्या या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खाजगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बबन पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख …
Read More »सीकेटी महाविद्यालयात कर्करोग दिनानानिमित्त ऑनलाइन अतिथी सत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त 04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये कर्करोग तथा विशेषत्वाने स्तनांचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराबद्द्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »पटेल ज्वेलर्सच्या दागिन्यांची कमी किंमत आणि योग्य भाव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील पटेल ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ व कमीत कमी योग्य किंमतीत व्हावी म्हणून या पुढे कुठलेही दागिना किंवा वस्तू पीएसपीवर विकली जाईल. पीएसपी म्हणजे पटेल ज्वेलर्स का सही प्राईज पीएसपी ही किंमत इतर कुठल्याही ब्रँड किंवा दुकानांच्या तुलनेने कमीत कमी व योग्य भावात असेल. …
Read More »खांदा कॉलनीत पोळी भाजी, स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील श्रीकृष्णा गार्डन सोसायटी येथे कुणबी समाज संस्था, पनवेल यांच्या महिला विभाग पदाधिकार्यांनी एकत्र येऊन श्री अन्नदा पोळी भाजी आणि स्नॅक्स कॉर्नर सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 4) माघी गणेशोत्सव दिनी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper