पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांती आणून स्वातंत्र्याचा लढा बळकट करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 17) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जन्मस्थळी शिरढोण येथे भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यासोबतच मशाल रॅलीत सहभाग घेतला. या वेळी दक्षिण …
Read More »कर्नाळा बँकेसह अनेक बँकांतील ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त बँक ठेवीदारांसाठी विम्याच्या संरक्षणाची रक्कम एक लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना आता झाला आहे. जर बँक बुडाली तर बँकांमध्ये ठेवी ठेवणार्या सामान्य नागरिकाला आधार मिळावा म्हणून हा …
Read More »विवेक पाटील जेलमध्येच; 28 फेब्रुवारीला सुनावणी
पनवेल ः बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात गुरुवारी (दि. 17) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. गोन्साल्वीस उपस्थित …
Read More »जासईत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी
उरण : बातमीदार, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी (दि. 17) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 140व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा; शिवजयंतीनिमित्त उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन शिक्षण विभागातर्फेगुरुवारी (दि.17) शिवजयंतीनिमित्ताने ’मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी ही स्पर्धा शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमुद केले. …
Read More »भाजप नेते कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
उरण : वार्ताहर भाजप जासई विभागीय अध्यक्ष कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 17) प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर येथील आदिवासी मुलांना आमदार महेश बालदी व उद्योजक पी. पी. खारपाटील यांच्या हस्ते शालोपयोगी वस्तू वाटप व खाऊवाटप करण्यात आले. तसेच भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ म्हात्रे, नयन …
Read More »संघर्ष प्रतिष्ठानतर्फे खांदा कॉलनीत शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने खांदा कॉलनीत शनिवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खांदा कॉलनी सेक्टर 13 येथील पाण्याच्या टाकीजवळ होणारे हे आरोग्य शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. या शिबिरासाठी खारघर …
Read More »अपहरण करणारी टोळी जेरबंद
पनवेल : वार्ताहर रागाच्या भरात सहा जणांनी पनवेल येथून एका व्यक्तीचे अपहरण केले होते. या संदर्भात तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरुपपणे सुटका केली. ज्ञानेश्वर जाधव (30 रा.औरंगाबाद) व त्याचा सहकारी अपहरण झालेला रवि नांगडे (30 रा.औरंगाबाद) यांनी …
Read More »पनवेलच्या जोशी आळीतील मारुती मंदिर नव्या रूपात
नगरसेवक राजू सोनी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील जोशी आळीतील आणि आताच्या सराफा बाजारातील शेकडो वर्षांपूर्वींचे असलेले मारुती मंदिर प्रसिद्ध नगरसेवक राजू सोनी यांच्या पुढाकाराने नव्या रूपात बांधण्यात आले आहे. हरी लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या असलेल्या या मारुती मंदिरात उत्तराभिमुखी वरद मारुतीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. जोशी यांच्या पूर्वजांनी …
Read More »पनवेल परिसरातील अपघातांत एक ठार; तीन जण जखमी
पनवेल : वार्ताहर पळस्पे परिसरात झालेल्या दोन अपघातामध्ये एक ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील पळस्पे येथील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेल जवळ गोवा-मुंबई महामार्गावर (एमच-05-के-9309) ट्रकचालक मासुम नुरमोहम्मद करबेलकर (वय 27) याने पुढे चालत असलेल्या ट्रेलर (एमएच-48-एवाय-7048) यास पाठीमागून धडक दिली. याचवेळी बाजूने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper