Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) नगरपालिका मैदान, सातरहाटी उरण येथील मैदानाची स्वच्छता करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वच्छता अभियानात मैदानावरील केरकचरा, बॉटल्स, इतर घाण साफ करण्यात आली व मैदान …

Read More »

दिवंगत एम. एस. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजनांचे, दलितांचे नेते आणि पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक दिवंगत एम. एस. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत नेरे येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम, सांगटोली येथील जना धर्मा आधारगृह आणि सांगटोली येथील आदिवासी बांधवांना अन्नदान, खाऊवाटप आणि गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

प्रमोद भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमोद भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सुकापूर यांच्या …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक; नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी

पनवेल  : प्रतिनिधी कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला असल्याने पालिका क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे, तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र ओमायक्रॉन रुग्ण वाढत …

Read More »

पनवेलमधील कोळवाडीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि 25:15 या मूलभूत सुविधा विकास योजनेतून 10 लाख निधीतून कोळवाडी गावातील जोडरस्त्याचे डांबरीकरण होत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न मांडला विधिमंडळात

10 तारखेच्या आत वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांकडून आश्वासन निधीच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय देयकेही देणार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील एसटी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपकर्‍यांना पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचार्‍यांच्या हितासाठी प्रश्न मांडून त्यांना वेळेवर …

Read More »

कर्नाळा बँक ठेवीदारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा अधिवेशनात बुलंद आवाज

पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या 500 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे या बँकेतील ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनात …

Read More »

पनवेल इनरव्हिल क्लबतर्फे मिनेश गाडगीळ यांचा सत्कार

रसायनी : प्रतिनिधी गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ यांनी सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने शेतकरी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 23) त्यांचा सत्कार करण्यात आला. मिनेश गाडगीळ यांनी भाताच्या तुसापासून फॅटी सिड व अल्कोहोल ज्याचा वापर बायोफ्युअलमध्ये होऊ शकतो, याचे संशोधन केले आहे. …

Read More »

‘दिशा’च्या निलम आंधळे यांनी केला बेघर मुलांबरोबर वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली भरणार्‍या शाळेत जाऊन तेथील बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. प्रत्येक व्यक्ती समाजशील असल्याने त्यातून उतराई होण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. त्याच भावनेतून कामोठे येथील निलम आंधळे काम करतात. 17 डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये गणवेश आणि मास्कचे मोफत वाटप

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि. 23) गरजू विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य यांच्या गरीब विद्यार्थी निधीतून मोफत गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयात प्रवेश घेणार्‍या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक मदत करण्यासाठी दरवर्षी …

Read More »