Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलच्या नवीन कोर्ट परिसरात वाहतूक कोंडीवर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नवीन कोर्ट परिसरात काही दुचाकी तसेच चारचाकी, रिक्षा आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या भागातील रहिवाशांना नेहमीच त्रास झाला होता. या संदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करताच अशा प्रकारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन कोर्ट …

Read More »

जासई-दादरपाडा रस्त्याचे काम अर्धवट

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील महत्त्वाचा असणारा जासई ते दादरपाडा  रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत असल्याने हा रस्ता पूर्ण कधी होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. कंत्राटदाराने रस्ता अर्धवट करूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जासई-दादरपाडा, …

Read More »

कसळखंडच्या उपसरपंचपदी भाजपचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. या निवडणुकीत भाजपचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत उपसपरंच महेंद्र गोजे यांचे अभिनंदन केले. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर महेंद्र गोजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात जाणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. अनेक वेळा गर्दीचा …

Read More »

गायक गणेश भगत यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. यमुना नचिकेत भोईर यांच्या स्मरणार्थ नवी मुंबई येथील यमुना फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मातृवदन पुरस्कार सोहळा नुकताच झाला. यामध्ये पनवेलमधील नामवंत गायक गणेश भगत यांना त्यांच्या गायन क्षेत्रातील कार्याची दखल घेत मातृवंदन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. गणेश भगत हे …

Read More »

सिंधुदुर्ग संघाच्या वतीने अनाथांना फराळ वाटप

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल या संस्थेच्या वतीने पनवेल परिसरातील आदिवासी वस्ती व अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला. कार्यकारिणीच्या वतीने संघाच्या सभासदांना फराळ देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभासदांनी आपापल्या घरी बनविलेला फराळ संघाच्या कार्यालयात जमा केला. …

Read More »

उरणमध्ये गडकिल्ले स्पर्धा उत्साहात

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सारडे विकास मंचतर्फे मुलांना गडकिल्ल्यांचे महत्व आणि माहिती व्हावी यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येकास मंचाचे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडून सन्माचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम रचित कांति म्हात्रे, द्वितीय निल सुशांत म्हात्रे, …

Read More »

जुनी वाहने खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रे तयार करून जुनी वाहने विकली जात असल्याचे तपासात आढळून आले आहे. चोरीच्या कारवर अपघातग्रस्त वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर टाकून अशी कागदपत्रे तयार केली जातात. त्यामुळे नागरिकांनी जुनी कार खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नवी मुंबई पोलिसांनी …

Read More »

अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी

उरण : वार्ताहर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील भातपीक पाण्याखाली आले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात असलेल्या पावसामुळे तयार झालेले पीक व  कापणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. आजही शेकडो …

Read More »

विनाहेल्मेट 8488 दुचाकीस्वारांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विनाहेल्मेट …

Read More »