Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

राज्य शासनाची ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; उरणमधील 80 टक्के शेतकरी अँड्रॉइड मोबाइलअभावी सुविधेपासून वंचित

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न उरणच्या शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनिवार्य करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करून ती महसूल विभागाच्या यंत्रणेकडूनच करण्यात यावी, अशी मागणी सामान्य शेतकर्‍यांकडून करण्यात …

Read More »

कुंडी नदी परिसरात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

पनवेल : वार्ताहर तालुक्यातील वाजेपूर गावातील कुंडी नदी परिसरात वर्षासहलीसाठी गेलेले काही पर्यटक अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकले होते. त्यांना सुखरूप स्थानिक ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी काहीजण त्या भागात पर्यटनासाठी गेले होते, परंतु अचानकपणे पाण्याचा लोंढा …

Read More »

बेकायदा गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्यावर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या टँकरद्वारे गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करणार्‍या चार जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून गॅस टँकर, मोटार सायकल, महिंद्रा कंपनीचा बोलरो या मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. …

Read More »

शौर्य दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने शौर्य दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात आपले मदतकार्य सुरू ठेवत कौतुकास्पद कामगिरी करणार्‍या आजी-माजी सैनिक, पोलीस आधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तकाळाचे बदलते पावले ओळखून युवा पत्रकार रवींद्र गायकवाड यांनी लाईव्ह महाराष्ट्र 9 या न्यूज पोर्टलची नव्याने सुरुवात केली आहे. या पोर्टलचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यातील विविध घडामोडी वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे पत्रकारांनी मानले आभार

पनवेल मनपा मुख्यालयात होणार पत्रकार कक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या महानगरपालिका मुख्यालयात अद्ययावत पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता प्रयत्न करणारे महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे गुरुवारी(दि. 30) पत्रकारांनी सदिच्छा भेट घेत आभार व्यक्त केले.पनवेल महापालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अद्ययावत …

Read More »

गाढी नदीवर पुलाचे काम लवकरच सुरू होणार!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : देवद-सुकापूर येथील गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे. तशा आशयाची वर्क ऑर्डर सिडको प्रशासनाने काढली आहे. या कामासाठी लागणारा निधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना मंजूर केला होता. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार …

Read More »

पनवेल मनपाकडे 57 कोटी मालमत्ता कर जमा; सवलतीचा आजचा अखेरचा दिवस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून 30 सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करांवरती 10 टक्के सवलत तसेच ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूट देण्यात आली आहे. बुधवारी (दि .29) दैनिक संकलन एक कोटी झाले असून एकूण 57 कोटी कर संकलन झाले आहे. या सवलतीचा गुरुवारी …

Read More »

कामोठे भाजपतर्फे राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा

कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप वैद्यकीय सेल कामोठे मंडलतर्फे राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळाचे आयोजन मंगळवारी (दि. 28)करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशोदा हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब खड्बडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा मोर्चा अध्यक्ष …

Read More »

पनवेलच्या मिहीर परदेशीला सुवर्णपदक

आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तसाऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओपन इंटरनॅशनल गेम्स 2021 बॅडमिंटन स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन पुरुष खुल्या …

Read More »