पनवेल ः वार्ताहर विमल फाऊंडेशन आणि तेरणा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथील बालाजी सिंफोनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास येथील रहिवाशांनी मोलाचे सहकार्य करून रक्तदान करीत उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. समाजात रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि समाजाला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …
Read More »बारा बलुतेदारांना आर्थिक साहाय्य द्या; भाजपची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी राज्यातील बारा बलुतेदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात त्यांचे धंदे बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, भाजप ओबीसी मोर्चा महिला रायगड जिल्हा अध्यक्ष सीताताई पाटील …
Read More »उरणमध्ये गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात उपाशी राहू नये या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील गरजू मजूरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. उरण-पनवेल मार्गांवर जेएनपीटी टाऊनशिप बस स्टॉप ते नवघर फाटा बस स्टॉपदरम्यान मुख्य रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीवासीय हे मोलमजुरी करतात. कडक निर्बंधाच्या काळात …
Read More »रेमडेसिवीर काळ्याबाजारातून खरेदी करू नका
जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डॉक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकलमध्ये कुठेही मिळणार नाही. जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या समितीमार्फत, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, फक्त त्या हॉस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, असा सरकारचा …
Read More »घरपोच मद्यविक्रीला परवानगी
पनवेल : वार्ताहर जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल-2, फॉर्म इ-2 व एफएलडब्ल्यू-2 मद्यविक्री अनुज्ञप्ती मधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली …
Read More »जुन्या पाठ्यपुस्तकांचे दान ठरतेय मोलाचे
हजारो मुलांच्या पालकांचा खर्च वाचला वैशाली जगदाळे यांचा उपक्रम यशस्वी पनवेल : वार्ताहर शैक्षणिक वर्ष संपले की ती पाठ्यपुस्तक आता रद्दीत दिले जातात. परंतु ही पुस्तक दुसर्या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाऊ शकतात. याचे महत्त्व कामोठे येथील एका शिक्षकाने समाज माध्यमातून अनेक पालकांना पटवून दिले. त्यामुळे आता या पुस्तकांची आदली बदली करून …
Read More »अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत
पनवेल : प्रतिनिधी शांतिवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …
Read More »लग्नसराई हंगामावर यंदाही कोरोनाचे सावट
सोहळे लांबणीवर टाकण्याचा नाइलाज पनवेल : वार्ताहर कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा फटका यंदाच्या लग्नसराई हंगामालाही बसला आहे. दणक्यात बार उडवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्यांना यापूर्वी ठरलेले मुहूर्त रद्द करून अनिश्चित काळासाठी लग्नसोहळे लांबणीवर टाकण्याचा पर्याय नाईलाजाने निवडावा लागला आहे. मागील …
Read More »अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत
पनवेल : प्रतिनिधी शांतीवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …
Read More »नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगा
पनवेल ग्रामीण पोलिसांकडून दंड वसुली पनवेल : रामप्रहर वृत्त खारपाडा चेकपोस्टवर पनवेल ग्रामीण पोलिसांकडून कडक निर्बंधांचे नियम तोडणार्यांकडून आर्थिक दंड वसुलीसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निर्बंध तोडणार्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून येथील कळंबोली, पळस्पे फाटा, खारपाडा टोल नाका येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper