Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मिळेनासा झाला ‘एक घास काऊचा’

पनवेल : वार्ताहर – कावळा असा पक्षी आहे की शहरात असो नाहीतर गावात कावळा सगळीकडे आढळतो. त्यामुळेच लहान मुलांना घास भरवताना प्रत्येक आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत भरवत असते. पण लॉकडाऊनमुळे या काऊलाच घास मिळेनासा झालेले दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हॉटेल, खाद्य …

Read More »

न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने 85 ग्रामस्थांना धान्याचे वाटप

उरण : प्रतिनिधी – न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने 85 ग्रामस्थांना शनिवारी (दि. 11) न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संचारबंदी, लॉकडाऊन दरम्यानच्या पार्श्वभूमीवर न्हावा येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये पाच किलो …

Read More »

घरात राहा, सुरक्षित राहा! -रजनी कोळी

उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उरण तालुक्यात  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उरण शहरातील नागरिकांनी घरात राहा, आणि सुरक्षित राहा, असे आवाहन उरण नगर परिषदेच्या आरोग्य सभापती तथा नगरसेविका रजनी सुनील कोळी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच रजनी कोळी पुढे म्हणाल्या की, उरण नगर परिषदेकडून कोरोना …

Read More »

सोशल डिस्टन्सिंग पाळून कामोठ्यात भाजीवाटप

पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, काही नियम आणि अटी शासनाकडून घालण्यात आले आहे. त्यापैकी एक सोशल डिस्टन्सिंग. या सोशल डिस्टन्सिंगमुळे या आजारावर नक्की अंकुश ठेवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच नियमाचे पालन करून शनिवारी (दि. 11) कामोठे वसाहतीमधील समाजसेवक सखाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना …

Read More »

उरण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज

तालुका आरोग्य अधिकार्‍यांची माहिती; कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा 24 तास अहोरात्र कार्यरत आहेत. उरण तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता आणखी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील आवश्यकतेनुसार रायगड जिल्हा परिषदेकडून उरण तालुक्यासाठी …

Read More »

पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले कर्नाळा अभयारण्य

उरण : प्रतिनिधी – लॉकडाऊन, संचारबंदीदरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे येथील कर्नाळा अभयारण्यात कधी नव्हे ती निरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाजाचा किलबिलाट वाढला आहेच. त्याशिवाय अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणार्‍या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे सुमारे 80 टक्के कावळे आणि माकडांनी आता आपला मोर्चा …

Read More »

आसल ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तू

कडाव ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील बांधकाम व्यावसायिक व फॉर्म हाऊसधारकांच्या मदतीने आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी, वस्त्या आणि दलित वस्तीतील 350 कुटुंबांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  चिंचवाडी, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामण दांडवाडी, नाण्याचा माळवाडी, आसलवाडी, …

Read More »

‘रोटरी’कडून आदिवासींना वस्तूंची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम डोंगरदर्‍यांत राहून लाकूड फाटा विकून मोलमजुरी करणार्‍या आदिवासी समाजावर होत असल्याची परिस्तिथी पाहिल्यानंतर …

Read More »

पनवेलमध्ये वेबलिंकद्वारे आरोग्य सर्वेक्षण

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन तसेच वेबलिंकद्वारे आपली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.  आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या मोबाइलवर 022-35155022 या …

Read More »

क्रांतिकारी सेवा संघातर्फे गरजूंना मदत

पनवेल : कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे, अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ  फडके यांच्या हस्ते तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. आजपर्यंत एक हजार 500 हुन अधिक कुटुंबियांना …

Read More »