Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नववर्षाचे स्वागत वृक्षारोपणाने

पनवेल : बातमीदार रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या करून नववर्षाचे स्वागत करणारी मंडळी गाढ झोपेत असताना खारघरच्या ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. खारघर हिल, सेक्टर 35 येथील तलावाच्या शेजारी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांनी 55 झाडांचे रोपण केले. ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ नावाचा ग्रुप खारघरमध्ये …

Read More »

खारघर टेकडीवरील हिल प्लॅट्यू प्रकल्प बांधकाम उंचीची अट शिथिल

प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू पनवेल : बातमीदार विमानतळ परिसरातील बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला सिडकोचा कोट्यवधी रुपये उत्पन्न देणारा बेलापूर येथील पारसिक टेकडीवरील ‘खारघर हिल प्लॅट्यू’ प्रकल्प बांधकामाच्या आशा उंचावल्या आहेत. येथील बांधकाम उंचीची अट शिथिल झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी सिडकोने या थीम प्रकल्पासाठी …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाला वेग

अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस पनवेल : बातमीदार नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. …

Read More »

हस्तांतरण शुल्काचे दर कमी केल्याने पालिकेची प्रलंबित प्रकरणे निकाली

परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने कमी झाला हस्तांतरण शुल्क दर पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर वाढविण्यात आलेले हस्तांतरण शुल्काचे दर कमी करण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांची मोठी आर्थिक बचत झाल्यामुळे हस्तांतरण करण्यास मालमत्ताधारकांनी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत वर्षभरातील आणि गतवर्षीची …

Read More »

उरणमध्ये तेलाचा कंटेनर उलटून वाहतूक ठप्प

उरण : बातमीदारतालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. 1) तेलाचा एक कंटेनर उलटला. त्यामुळे तेल रस्त्यावर पसरून वाहतूक जवळपास पाच ते सहा तास ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून निघालेल्या ट्रायटोन मल्टिमोडल लिमिटेड कंपनीच्या ट्रेलरवरून नेण्यात येणारे दोन 20 फुटी कंटेनर न्हावा-शेवा पोलीस …

Read More »

पनवेलकरांनी केले नववर्षाचे स्वागत जल्लोषात, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर नववर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांनी जल्लोषात केले असले तरी बाजारपेठेत मंदीचा फटका या जल्लोषात दिसून आला. त्यातच हॉटेल पहाटे पर्यंत तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असले तरी त्यांना प्रतिसाद लाभला नाही. नाक्यानाक्यावर असलेला पोलीस बंदोबस्त व ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या …

Read More »

‘त्या’ बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेत लाल रंगाच्या ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तिचे नाव कळाले असून त्याचे नाव इमरान उर्फ छोटू असल्याचे कळाले आहे. छोटूच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून लालता प्रसाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. …

Read More »

शेवगाव-मुंबई बसचे पनवेल येथे स्वागत

पनवेल : बातमीदार शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्‍या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी …

Read More »

आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 5 डी मार्टसमोर व सेक्टर 1 परिसरात आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी (दि. 27) येथून एका व्यक्तीच्या खिशातून 12 हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला आहे. यापूर्वीदेखील या बाजारात आलेल्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. दर …

Read More »

उरणमध्ये आचार्य अत्रे कट्टाचा कार्यक्रम

चिरनेर : प्रतिनिधी रायगड जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटना संचलित, आचार्य अत्रे कट्टा कार्यक्रम नुकताच उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व कट्ट्याचे अध्यक्ष धनंजय गोंधळी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय गायकवाड हे उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणार्‍या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये …

Read More »