Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल, नवी मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत, तर पनवेल आणि मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव …

Read More »

उरण येथे श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे यात्रा

उरण : वार्ताहर येथील केगावमधील श्रीक्षेत्र माणकेश्वर तीर्थक्षेत्र   म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवमंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त यात्रेचे अयोजन मंगळवार (दि. 12)नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यात्रेकरूंनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता मंदिरासमोरील दीपमालेचे दीपपूजन सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व केगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते …

Read More »

जागृती महिला मंडळातर्फे अनोखा उपक्रम

पनवेल : वार्ताहर कळंबोली येथील जागृती महिला मंडळाने मंगलेश्वरी माता मंदिराजवळ से. 6 मध्ये मेडिकल कॅम्पमध्ये पाच हजार वर्षे पूर्वीच्या व्हॅक्युम थेरेपी अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर करून सायटीका स्लीपडिस्क, स्पाँडेलिसीस, फ्रोझन, शोल्डर मायग्रेन, डिप्रेशन पॅरालिसीस यासारख्या अनेक आजारांवर डॉ. अनिल जानी यांच्या माध्यमातून औषधाशिवाय मोफत उपचार शिबिराचे आयोजन केले होते. त्याला …

Read More »

अपंग क्रांती संघटनेचे चर्चासत्र

पनवेल : बातमीदार दिव्यंगांच्या न्याय्य हक्क व सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षापासून कार्य करत असणारी अपंग क्रांती संघटनेची पदाधिकारी मंडळाची विशेष नियोजन सभा व चर्चासत्र आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शांतिवन येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष बाळाराम रोडपालकर होते. सभेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील …

Read More »

पाच लाखांचे मोबाइल जप्त, शहर पोलिसानी केली चार जणांना अटक

पनवेल : बातमीदार शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणार्‍या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाईल व 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भीम कमान बिस्टा (25, कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (32, नवीन पनवेल), चकरा ऊर्फ चरण बहादुर रतन शाही (25, पुणे), रमेश भवन रावल (30, …

Read More »

रसायनीत पक्षीसप्ताहानिमित्त तरुणांना मार्गदर्शन

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी व आसपासच्या परिसरांतील तरुणांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पक्षी निरीक्षण सप्ताहानिमित्ताने मारोती चितमपल्ली (पक्षीतज्ज्ञ) व डॉ. सलिम अली (पक्षीतज्ज्ञ) यांच्या प्रेरणेने मोहोपाडा एचओसी कॉलनी परिसरातील तरुणांना विविध पक्षांविषयी माहिती देण्यात आली. या वेळी पक्षी कसे ओळखायचे, त्यांचा शोध कसा घ्यायचा याविषयी पक्षीतज्ज्ञांनी माहिती दिली. या …

Read More »

अभिनव युवक मित्र मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व …

Read More »

पनवेल पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 12) झाली. या वेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. उपस्थित सभासदांनी एकमताने साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची सन 2019-2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली. या वेळी नवीन कार्यकारिणी …

Read More »

‘ती’ गावे तळोजा पोलीस ठाण्याला जोडावीत

पनवेल : बातमीदार तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदिवासी वाडी ही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, मात्र या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने …

Read More »

सरपंच निलेश म्हात्रे यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी अर्जुन म्हात्रे, संतोष गाताडे, राहुल घरत, विजय म्हात्रे, मानसी म्हात्रे, जिनेश कांबळे, वासुदेव म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रवीण म्हात्रे यांचा वाढदिवस पनवेल : …

Read More »